दिनांक १६ जानेवारी,श्रीगोंदा:
दिनांक १२ जानेवारी रोजी औटीवाडी येथे पत्रकार अनिल तुपे चषक पार पडला. या चषकात २२ संघांनी भाग घेतला होता.१२ दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेत तिसरे बक्षीस अशोका संघ शनीचौक, श्रीगोंदा यांना रुपये ३०००/- रोख रक्कम व ट्रॉफी, द्वितीय बक्षीस शिवाय क्रिकेट क्लब तुपे वस्ती, ७०००/- रुपये रोख रक्कम आणि ट्रॉफी व प्रथम बक्षीस राहुल गांधी क्रिकेट संघ शनीचौक, श्रीगोंदा, रोख रक्कम ११०००/- रुपये रोख व पत्रकार अनिल तुपे चषक नावाची ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.

या सत्कार समारंभात पाहिले बक्षीस देणारे नंदू लाढणे (उप नगराध्यक्ष) व दिपाली अंबासास औटी (नगरसेविका), द्वितीय बक्षीस शुभांगी मनोहर पोटे(नगराध्यक्षा) व पत्रकार अनिल तुपे, त्रितीय बक्षीस संग्राम घोडके (नगरसेवक) यांनी दिले. तर विशेष बक्षीस सोनाली हृदय घोडके (नगरसेविका) व खेळाडुंना टी शर्ट बाप्पू माने यांनी दिले.
या कार्यक्रमात हरिदास (आबा) शिर्के, रमेश लाढाणे (उप नगराध्यक्ष), नंदू लाढाणे, (नगरसेवक) मनोहर पोटे, बाप्पू गोरे, संतोष खेतमाळीस, संतोष क्षीरसागर, अशोक खेंडके, संग्राम घोडके, अंबादास औटी तसेच विकास तुपे, शुभम तुपे, सौरभ तुपे, मयूर तुपे, साजन तुपे, विजय तुपे, अविनाश खवळे, संकेत लोखंडे, प्रथमेश तुपे, ओंकार तुपे, रितेश तुपे सह विविध क्रिकेट संघाचे खेळाडू व मान्यवर उपस्थित होते. सदरील चषक शांततेत पार पडला.
स्रोत(पत्रकार अनिल तुपे)
