दिनांक १७ जानेवारी, श्रीगोंदा:
मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंद्यातून नगरला जाण्यासाठी निघालेल्या एका महिलेचा श्रीगोंदा-त्र्यंबकेश्वर गाडीच्या वाहकाने गाडीमध्ये शेजारी बसल्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे करीत, छेडछाड केल्याबाबत माहिती समजली आहे. दिनांक १० जानेवारी रोजी हा प्रकार घडला आहे. यानंतर नमूद महिलेने प्रवासादरम्यान गावातील संबंधितांना फोन करून, एसटीत घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान एसटी बस नगरच्या माळीवाडा बस स्थानकावर पोहचताच. महिलेचे नातेवाईक बसस्थानकांवर उपस्थित होते. यावेळी गाडीतून वाहक खाली उतरताच त्याची नातेवाईकांनी यथेच्छ धुलाई केली.

महिलेची छेडछाड करणार्या या एसटी वाहकाला नागरिकांनी माळीवाडा बसस्थानकात चांगलाच चोप दिला. सदर महिला श्रीगोंदा बसस्थानकातून नगरकडे येण्यासाठी श्रीगोंदा-त्रिंबकेश्वर या बसमध्ये बसली होती. प्रवासात एसटी वाहक त्या महिलेशी अश्लिल चाळे करु लागल्याने तिने संबंधितांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर वाहकाला पोलीस ठाण्यात नेल्याचेही समजले.
स्रोत:(वृत्तसंस्था)
(प्रतिकात्मक छायाचित्राचा वापर करण्यात आला आहे.)
