दिनांक १९ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:
ढवळगाव येथील ‘दै. लोकमत’ चे पत्रकार, तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे माजी कार्याध्यक्ष व उपाध्यक्ष पंकज गणवीर यांनी येळपणे गणासाठी अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून प्रभावी उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत, जनसामान्यांसाठी कार्यरत असणाऱ्या गणवीर यांनी आपल्या कार्यामुळे समाजात एक आदराचे स्थान निर्माण केले आहे.

“पत्रकारिता ही लोकशाही टिकवून ठेवते आणि प्रगतीशील सामाजिक बदलाची सूत्रे आहे,” हे व्रत मनाशी बाळगून पंकज गणवीर यांनी तळमळीने कार्य केले आहे. सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, कला, क्रीडा, कृषी आणि आरोग्य यांसारख्या विविध विषयांवर ज्वलंत आणि वास्तववादी लिखाण करून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात नाव कमावले आहे.

समाजाच्या योगदानातून आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो, या सद्भावनेतून ते नेहमी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर राहिले आहेत.

विविध क्षेत्रातील अनुभवाच्या आधारे ते जनमाणसांना आणि वयोवृद्धांना आधार देण्याचे काम करत आहेत. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक योगदानासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.

पहिल्या कोरोना काळात ‘गावबंदी’ असताना, गणवीर यांनी ‘कोरोना योद्धा’ म्हणून काम केले. त्यांनी कोरोनासंदर्भात जनजागृती केली आणि शक्य असेल तेव्हा नागरिकांना मदत पोहोचवली. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, रोजंदारीवर काम करणारे मजूर, वयोवृद्ध नागरिक ज्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नव्हते अशा गरजू आणि गरजूंना शिरूर येथील दानशूर व्यक्ती धरमचंद फुलफगर यांच्या मदतीने किराणा किटचे वाटप केले.

याच माध्यमातून त्यांनी शैक्षणिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना फीसाठी आर्थिक योगदान, गरीब, गरजू, आजारी पेशंट्सना आर्थिक मदत मिळवून देणे, तसेच निराधार वयोवृद्धांना गरजेनुसार किराणा व औषधांसाठी मदत पोहोचवण्याचे कार्य सेवाभाव ठेवून सुरू ठेवले आहे. “जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले” या उक्तीप्रमाणे त्यांचे कार्य अखंड सुरू आहे.

पंकज गणवीर यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे:
- कोरोना योद्धा म्हणून रिपब्लिकन युवा सेना संस्था व अग्निपंख फाउंडेशन, श्रीगोंदा यांच्याकडून सन्मानित.
- सन २०१९ मध्ये श्रीक्षेत्र रामेश्वरम कन्याकुमारी यात्रेदरम्यान स्वयंसेवक म्हणून विश्वास भाऊ गुंजाळ (क्षेत्र देवदैठण) यांच्या वतीने सन्मानित.
- पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सन २०२० मध्ये श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, येळपणे-पिसोरे-पोलीस वाडी यांच्याकडून सन्मानित.
- उत्कृष्ट योगदानाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरेगव्हाण व कोरेगव्हाण ग्राम परिवारातर्फे सन्मानित.
- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती, राजापूर यांच्याकडून २०२३ मध्ये समाजरत्न पुरस्काराने सन्मानित.
- युगप्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०२३ मध्ये मा. ना. दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वाताई वळसे पाटील यांच्या शुभहस्ते सन्मानित.
- सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा या विविध क्षेत्रांतील कामगिरीबद्दल प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ परदेशी यांच्या हस्ते सन्मानित.
- ‘एक मैफिल कवितांची साहित्यमंच महाराष्ट्र राज्य’ यांच्याकडून पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल पत्रकाररत्न पुरस्काराने सन्मानित.
- ‘संघर्षनामा प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया’ (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून संघर्षरत्न समाजभूषण पुरस्काराने मा. मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते सन्मानित.
येळपणे गटामध्ये गणवीर यांचा सर्वपक्षीय मोठा मित्र परिवार असून ते नेहमी प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन, ते आता राजकारणात येऊन प्रभावी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
स्रोत:( प्रसिद्धी पत्र)

Advertise…
