पत्रकार दिनानिमित्त विविध राजकीय, सामाजिक, संघटनांकडून पत्रकारांचा सन्मान..

दिनांक ६ जानेवारी,श्रीगोंदा:

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीगोंद्यात पत्रकार दिन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी व पदाधिकाऱ्यांनी संबंध तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करून, त्यांना शुभेच्छा दिल्या.

https://bit.ly/bspmycityshrigonda

श्रीगोंद्याचे तहसिलदार प्रदीपकुमार पवार, माजी आमदार राहुलदादा जगताप व त्यांचे सहकारी, वृद्धेश्वर मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह संस्थेचे चेअरमन वांगने भाऊसाहेब, स्वामिनी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन सौ. प्रतिभा विठ्ठल गांधी व व्हाईस चेअरमन मीरा नवनाथ भोस, साई उद्योग समूहाचे अध्यक्ष सदाण्णा पाचपुते, काष्टी सोसायटीचे चेरमन भगवानराव (आबा) पाचपुते व दत्तात्रय पानसरे, श्रीगोंदा नगरपालिकेचे (उप नगराध्यक्ष) रमेश लाढाने, (मुख्याधिकारी) मंगेश देवरे, (नगरसेवक) मनोहर पोटे, निसारभाई बेपारी, शहाजी भाऊ खेतमाळीस, अंबादास औटी, संतोष खेतमाळीस, सतीश मखरे, संतोष क्षीरसागर, प्रशांत गोरे, गणेश भोस, (पोलिस निरीक्षक) रामराव ढिकले यांनी श्रीगोंद्यातील विविध वृत्तपत्रांत, इलेक्ट्रॉनिक मीडिया व न्यूज पोर्टलच्या माध्यमांतून काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान केला.

यावेळी जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या (जिल्हाध्यक्ष पदी) दत्तात्रय पाचपुते, (तालुकाध्यक्ष पदी) अंकुश शिंदे व लढा पत्रकार संघटनेच्या (जिल्हाध्यक्ष पदी) रमेश गांधी यांची यांची निवड झाल्याबद्दल सर्व पत्रकारांसह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी (जिल्हाध्यक्ष) पत्रकार दत्तात्रय पाचपुते, (तालुकाध्यक्ष) पत्रकार अंकुश शिंदे, अनिल ठवाळ, राजु शेख, नितीन रोही, विजय मांडे, विजय उंडे, अंकुश तुपे, योगेश चंदन, राजेंद्र राऊत, रमेश गांधी, रामदास कोळपे, पंकज गणवीर, दिपक वाघमारे, अमोल बोरगे, शिवाजी साळुंखे, सुभाष शिंदे, बाळासाहेब काकडे, अमोल गव्हाणे, मिराताई शिंदे, माऊली येवले, दादासाहेब सोनवणे, संजय काटे, शकील भाई शेख, सोहेल शेख, अनिल तुपे, शरद शिंदे, दत्ता जगताप, किशोर थिटे, मुस्ताक भाई पठाण, गणेश कविटकर, पीटर रणसिंग, शेख युसुफ पटेल, प्रमोद आहेर, अशोक होनराव इत्यादी पत्रकार बांधव कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

स्त्रोत:(आयोजित कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading