कळा, उत्तम बंडू तुपे(भाग २१).

कळा, उत्तम बंडू तुपे..

” वरकुट्यात मुक्कामाची गाडी धरली . दुपारच्या टिपणाला गावात आलो . कामाचं दिवस हुतं . गावात चिटपाखरू नव्हतं . एकटाच घराकडं चाललो हुतो . माझ्याआदी नजर घरावर पडली . घराला कुलूप हुतं . तसाच माघं फिरलो . धोंडी कारभाऱ्याच्या मळ्याची वाट धरली . गावचा ओढा पार करून दरड चढलो ; तर धोंडी कारभारी दिसला .

https://bit.ly/bspmycityshrigonda

त्यानंबी मला बघिटलेलं ; तवा वाटंवर थांबला हुता . चार पाऊलं लांब हाय तवर कारभाऱ्यानं इचारलं – ” संतू ! घावली का रं ? ” ” धा गावांची शिवारं चाळली . कुठं पत्त्या न्हाय . ” जाव दे ; गेली ती आपल्याला मेली समज . आता घराकडं ध्यान दे . कष्टाचं दिस हायतं . आता दुर्व्याबी हाताला आलाय . ” व्हय ; आता जलमभर कष्ट करायचं . कष्टांत मरायचं . कारभारी , दुर्व्या आलाय काय वस्तीला . ” “ परवादिशी आला हुता . त्याच्यावर कुठं दिसला न्हाय . ” ” लोचीचं कसं हाय ? ” ‘ आता चांगली भानावर आलीय ; दुर्व्या म्हणत हुता . “ ही दोघं मायलेकरं कुठं रोजगारानं तर गेली न्हायती ? ” ” गेली असतेली ; काय टुकडा – पाणी खाल्लंय का ? ” ‘ कसला टुकडा – पाणी ; चार रोज झालं भाकरीची वळख न्हाय . ‘ “ आरं ; मंग वस्तीला चल . घासभर खा . बोलत बोलत धोंडी कारभाऱ्यासंग त्याच्या वस्तीला गेलो .

दोघंबी बसलो चुळा भरून . दोन ताटं आली . कारभाऱ्याच्या सुणनं पुढ्यात ताट आपटून झणकाऱ्यानं मागं फिरली . ताटात तिनकोर भाकरी , वांग्यांचं कोरड्यास . एका घासात सरलं आसतं . कोरड्यासबी मनाजोगं झालं हुतं . त्याच्या वासानं भूक मोठी झाली . खाली बघून खात हुतो . कारभाऱ्यानं आत आवाज दिला “ भाकरी आणा . ‘ कारभाऱ्याच्या सुणनं आणखी तिनकोर भाकरी आणून ताटात आपटली . ताटातलं कोरड्यास अंगावर उडलं . तवा कारभारी सुणंवर डापरला “ का हातांत जीव न्हाय वाटतं ? भाकरी ताटात हाळून मांडा . कारभाऱ्याची सुण वरमली . दारात उभी राहिली . “ हाऽड की हाड ; तुला आणखी कुठली भाकरी टाकू ? गाव फिरून ये . हिथं राखणीला न्हाय ; नुस्तं खायला ये . कुठणं घालायचं तुला ? ” कारभाऱ्याची सुण कुत्र्याला बोलत हुती ; डोळं माझ्यावर फिरत हुतं . पुढ्यातली भाकरी शेणाचा पूं ठिवल्यागत पुढ्यात दिसत हुती ; तरी खाली मुंडी घालून खात हुतो . ” ” तांब्याभर पाणी ढोसून मागं सरलो . कारभारी आजून जेवत हुता . तोंडातला घास घिळला ; तवा कारभारी बोलला – “ संतू , आता बसून काय करणार रं ?

तेवडी वैरण तरी तोड ; गायासनी घाल . ” गाया ? कवा आणल्या ? ” ” झालं दोन रोज ; होस्टल जातीच्या हायत्या . एक डाव गायांच्या नव्या गोठ्याकडं नजर टाकली . माकून टोकून खाल्लेली भाकरी डोळ्यांत उभी . काम करायचं ; आपल्यावर कुणाचं उपकार नगं . त्यांचं घासभर आन्न खाल्लं . त्या अन्नाला जागायला पायजी . इळा मागून घिटला . तडक वावरात शिरलो . खसाखसा वली वैरण कापली . चांगला अंग उचलणीचा भारा घातला . भाराभर वैरण कापून आणली . कुन्हाडीनं खांडली . खांडता खांडता आपलीबी खांडकी उडत हुती . कु – हाडीच्या घावागणिक मनाचं टुकडं पडत हुतं . वैरणीच्या रसरसीत धाडांगत उभ्या आठवणी तुटून मरून जात हुत्या . धाटावर डोळा ठिवून वैरण तोडत हुतो . तवर कारभाऱ्याच्या सुणेनं बाभळीची दोन लाकडं आणून टाकली . ” ” येवढी फोडून देता काय ? सांजला जळण न्हाय . लाकडं बघून मनाचा कोळसा झाला . जुणं लेपाटं उसवल्यात एक एक टाका उसवत गेला . जुन्या आठवणी पुढ्यात उभ्या . मंगल बारकी हुती तवाची गोष्ट . कारभाऱ्याचं खळं चाललं हुतं . अंगाची भुस हुईस्तवर लोची आन् मी खळ्यात राबत हुतो . कारभाऱ्याची बायको ताक घुसळत हुती .

मंगल कवाना खेळत खेळत गेलेली . कारभारणीनं ताकात गूळ घालून मंगलीला दिलं हुतं . मंगली ताकगूळ खान्यात गुतली हुती . भगटलेलं वारं . मदान वाऱ्यावर सोडलेलं . खाली दान्यांची रास . मदान सरूस्तवर मंगलीचं ध्यान झालं न्हाय . मदान सरलं तवा लोचीला ध्यान झालं . कावरीबावरी हून लोची मंगलीला बघाय लागली . चोळीतून दूध पाझरायला लागलं . ‘ मंगल , मंगल ‘ करून लोचीनं हाका मारल्या . जवळची हीर मनात केदासनीसारखी . मंगली खेळत खेळत तिकडं गेली आसली तर ; ज्या हिरीकडं बघून तहाण लागावी ; त्या हिरीकडं बघून घशाला कोरड पडली हुती . लोची रडकुंडीला आली . तवा कारभारणीनं मंगलला कडंवर आणली . पळत जावून लोचीनं तिला मिठी मारली . तिथंच बसून तिच्या तोंडात थान कोंबायला लागली . तवा मालकीन बोलली , “ लोचे ! पोरीला संभाळ . वाण्याउदम्यांच्या घरांत संपादून जाईल आसं रूप हाय . एकादं पोरीला पळवलं … ? “ संतू ! येवढी लाकडं फाकळून दे म्हटल्यावर ; कुल्हाडीनं लाकडं फाकळत हुतो . मंगल रांगत आली हुती .

माझं ध्यान लाकडावर . आता घाव घालणार तवर कारभारीनं आरडली- “ संतू , संतू ‘ पळत येवून कारभारणीनं पोरगी ओढली . “ चंडाळा , मारली हुती का पोरीला . आरं , हे रतन हाय , ह्याला जतन कर . ” पुढ्यातली लाकडं बघून डोळं डबडबलं . त्या वक्ताला ते घडलं आसतं तर दोन राती रडून गप झालो असतो . आता ह्यो परसंग आला नसता ; वाटायला लागलं . ” ” कारभाऱ्याच्या सुणेनं टाकलेली लाकडं फाकळत हुतो . एक – एक ढलपी लांब उडून जात हुती . तिकडं बघत हुतो . लाकडाच्या फाकळ्या पडत हुत्या ; तसं हुर्द फाटत चाललं हुतं . पार कडूसं पडलं तवा गावाकडं निघालो . लोची – दुर्व्या आता रानातनं आलेली असतेली . हे मनात धरून सपाट्यानं पाय उचलत हुतो . गावातनं जायला नगं म्हणतानं गावाच्या कडनं व्हरलकितनं निघालो . भेलक्याच्या घराला बगल देवून पुढं गेलो . तवर भेलक्याच्या सुणनं हाका मारल्या . “ घराची किल्ली घेऊन जावा . चकार फिरल्यागत फिरलो . “ दुर्व्या ? ” “ दुर्व्या , लोचामामी गेली . “ कुठं ? ” “ दुर्व्याचा मामा आला हुता . गेला घेवून . ‘ पाखरागत उडलेलं काळीज थिर झालं . खीनभर खाली बसलो . “ लोचीचं बरं हुतं का ? “ करलं वं … बरं तुम्ही गेला नि तिचं टकूरं आणखी भडक झालं . ‘ मंगल मंगल ‘ म्हणून कुणालाबी धरायला लागली . हाळद म्हणून धुरोळा लोकांच्या अंगाला लावायला लागली . गडी – बापय बघून धोंड हाणायची . गावकरी चिडलं . लोचामामीला धरून गावानं डाग वं … दिलं . आमचं हाल बघून दुर्व्या तान्या वासरागत हंबरला बघा . गावकऱ्यांनी त्याच्याकडं बघितलं दिकून न्हाय . आय , आय ‘ , म्हणून दुर्व्या लई आरडला . भुईवर टक्कूर आपटून घिटलं . त्याचंबी टक्कूर फुटलं ; मामंजी . कानांत शिसं तापवून वतल्यागत वाटत हुतं . “ पर कारभाऱ्यानं मला हे सांगितलं न्हाय .

https://bit.ly/bspmycityshrigonda

घिटला हुता . ह्या … ह्या झाडाला … व डांबली हुती . तापलेली खुरपी चराऽरा टक्कूरीवर फिरवली ; तवा लोचामामी गायगत आरडली बघा . रातभर बांधून ठेवली हुती . त्यांचं दगदीर मोठं . सकाळचा त्यांचा भाऊ ” ” त्यानं तर पुढाकार आला . गेला घेऊन . ‘ “किल्ली घेऊन उठलो . दारात आलो . आता कुणासाठी घर उघडायचं ? घराचं घरपन गेलं . आसीच दारं झाकलेली ठिवावी ; वाटायला लागलं . अंधार पडला हुता . गच अंधारात घर पाह्यलं . डोळ्याला कायबी दिसत नव्हतं . काळ्याकरंद सावळीखाली धगटी पेटल्यागत एकटाच धगधगत हुतो..

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading