गावच्या शाळेच्या विकासात गावातील लोकांचा सहभाग असेल तरच शाळेचा विकास झाल्याशिवाय राहात नाही. श्रीगोंदा शहरापासून जवळच असणाऱ्या कोकणगावातील ग्रामस्थांनी एकत्र येत विकास साधला. या शाळेची यशोगाथा

श्रीगोंदा तालुक्याच्या ठिकाणापासून १५ किमी अंतरावर असणारे दुर्गम गाव कोकणगाव. या गावात सध्या जिल्हा परिषदेची इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतची शाळा आहे. ही शाळा सर्व भौतिक सोयी सुविधांनी संपन्न आहे. ज्यात या गावातील लोकांचा सहभाग सातत्याने असतो. गावात सर्व जाती धर्माचे लोक अगदी गुण्यागोविदांने शाळेच्या प्रत्येक कार्यात पुढाकार घेऊन सहकार्य करतात. लोक शेती, मजुरी व मेंढपाळ करणारे ग्रामस्थ आहेत.

मोलमजुरी कष्ट करुन आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे आधिक लक्ष देत आहेत. लोक शाळेच्या विकास कार्यात आपला खारीचा वाटा उचलतात. श्रीगोंदा पंचायत समितीचे १८ वर्ष सभापती राहिलेले बापूसाहेब शंकरराव जामदार यांच्या प्रेरणेने विकासकाम सुरु आहे.

गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरीब कुटूंबातील मुले एमपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय आधिकारी होत आहेत. शाळेचे व गावचे नाव ते मोठे करत आहेत. यामध्ये दिग्वीजय अशोक जामदार, आरती देवीदास जामदार, आप्पासाहेब हंडाळ, चांगदेव हंडाळ हे दोन्ही बंधू देखील प्रशासकीय सेवेत आहेत. इतर क्षेत्रात चमकलेले प्रियंका जामदार, प्रितेश गुगळे, विलास शिंदे, संदिप कावरे, आविनाश जामदार असे अनेक क्षेत्रात मुले पुढे जात आहेत.

शाळेची स्थापना म्हणजे १९४८ सालची. जेमतेम १७ विद्यार्थ्यांनी सुरु झालेली शाळा. सुरुवातीला श्रमदानातून एक शाळा खोली बांधकाम करुन ही शाळा सुरु झाली. पुढे १९५८ पर्यत १ ली ते ४ थी अशा चार शाळा खोल्या बांधण्यात आल्या. बापुसाहेब जामदार यांच्या पुढाकारात ७ वी पर्यतची शाळा तयार झाली. सात वर्गखोल्या असलेली शाळा १९७२ च्या दुष्काळात तयार झाली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आधिक चार नवीन स्लॅबच्या खोल्या आहेत. एक काम्प्युटर खोली, एक प्रयोगशाळा, एक प्रोजेक्टर रूम, प्रशस्त खेळाचे मैदान, खो – खो, कबड्डीसाठी खास लाल मातीचे मैदान.

चार वर्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र जामदार होते. त्यांनी सर्व शिक्षकांच्या मदतीने शाळेच्या प्रांगणात शंभरच्या वर झाडे लावली. ही झाडे १०० टक्के जगवली. त्यासाठी बोअर घेऊन ठिबक सिंचनाची सोय केली. मुलांना पिण्यासाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय केली. आजही या शाळेतील सर्व शिक्षक जोमाने या शाळेत कार्य करत आहेत. शासनाच्या सर्व योजना काटेकोरपणे राबविल्या जात आहेत. कोकणगाव शाळेची खरी ओळख झाली ती शाळेच्या गुणवत्तेमुळे. शाळेतील सर्व शिक्षक, एक मुख्याध्यापक विषयावर मुलांना शिक्षण देत आहेत. ज्ञानरचना वादावर आधरित अनेक उपक्रम शाळेत राबवले जातात. गुणवत्तेबरोबरच अनेक सहशालेय उपक्रम शाळेत घेतले जातात. यातून मुलांमध्ये लहानपणापासून निकोप स्पर्धामय वातावरण तयार झाले आहे. सहा मुलामुलींनी या शाळेत आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिला जातो . स्वातंत्र्यदिनी काही रक्कम लोकांनी जमा केली असून त्यांच्या व्याजातील रकमेतून प्रत्येक मुलाला शिक्षणात हातभार लागेलल अशी वर्षासाठी रक्कम दिली जाते. गेली चार वर्षापासून हा उपक्रम सुरु आहे. खेळात देखील मुले तालुका पातळीपर्यत धडक मारतात.

सध्याच्या या डिजीटल युगात शाळेत प्रत्येक गावात घेऊन वर्गात लोक वर्गणीतून मुलांना शिक्षण दिले जाते. मुलांना कंम्प्युटर शिक्षण देखील दिले जाते. लोकवर्गणीतून या गावातील अनेक मदत करतात. रघुनाथ जामदार यांनी प्रिंटर, झेराक्स मशीन, सावता शेंडगे व सुरेश शेंडगे यांनी स्पीकर व साऊंड सीस्टी शाळेला भेट दिली . तसेच सर्वच गावातील अनेक लोकांनी वारंवार शाळेला मदत केली आहे. शाळेतील कार्यात त्यांना नेहमीच गटशिक्षणधिकारी गुलाब सय्यद व विस्तार आधिकारी कांतीलाल ढवळे यांचे मार्गदर्शन लाभले. व्यवस्थापन अध्यक्ष शरद शेंडगे, तसेच संजय जामदार, सतीश जामदार अशा शिक्षणप्रेमीचे नेहमीच शाळेला मोलाचे योगदान मिळत आहे.

शब्दांकन: शरद शिंदे, प्रतिनिधी, लोकमत..दादा सोनवणे, प्रतिनिधी, जनशक्ती

येत्या काळात शाळेला चार नवीन खोल्यांची मागणी केली, तसेच नवीन खोल्यांना संरक्षण भिंतीची मागणी केली आहे. तसेच जुन्या तीन खोल्याचे निर्लेखन करणे. दर्जेदार शिक्षण देणे देखील गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकजण परिश्रम घेत आहे. आदिनाथ भोयटे, मुख्याध्यापक..

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading