दिनांक १९ ऑगस्ट(कोसेगव्हाण,श्रीगोंदा):
तालुक्यातील कोसेगव्हाण येथे कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक भान जपत एक गाव एक गणपती बसविण्याच्या प्रशासकीय सूचनेचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
गणेश उसत्व साजरा करताना मंडळाने पोलीस स्टेशनची रीतसर परवानगी घेऊन एक गाव एक गणपती बसवावा.तसेच, चार पेक्षा जास्त लोक मंडळात दिसल्यास त्यांच्यावर साथ रोग प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हे दाखल करण्यात येतील.उसत्व साजरा करताना सर्वांनी काळजी घ्यावी व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मांडवगण पोलीस दूर क्षेत्राचे ठाणे अंमलदार बडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे यांनी कोसेगव्हाण येथे आयोजित बैठकित केले. यास सर्व ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे मा. चेअरमन, मा. उप सरपंच भिमराव बापूराव नलगे, (सरपंच) भुजंग कदम,(उपसरपंच) रतन चव्हाण, (चेअरमन) अकबर शेख, (व्हा-चेअरमन) झुंबरराव नलगे,(माजी सरपंच) दिगंबर शिंदे,आदेश नलगे, मोतीराम ढवळे, हौसराव गोरे, शंकर ढवळे, अनिल चव्हाण, भाऊसाहेब ढवळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
स्रोत:(महेश गौतम नलगे,कोसेगव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
