लोक सहभागातून बदलले ज्ञानमंदिर..

देशाचे सुसंस्कृत नागरिक ज्ञानमंदिरातून घडतात, गावचा, समाजाचा आदर्श असणारी ही शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा होय. अशा या देशमुखवस्तीच्या शाळेला सकारात्मक भावनेने काम करणारे शिक्षक लाभले. त्याच सेवाभावी वृत्तीने मदत करणारे पालक लाभले. याच मनोमिलनातून आणि सहकायार्तेन उभी राहीले देशमुखवस्तीचे आदर्श ज्ञानमंदिर …

१५ ऑगस्ट १९९१ रोजी अॅड . केशवराव नागवडे यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून भाऊसाहेब वाबळे, पांडुरंग सातकर, दादासाहेब चौधरी, अब्बास सय्यद यांना बरोबर घेऊन वाबळेवस्ती शाळेची स्थापना केली. सुरुवातीला शाळेला खोल्या नसल्याने नागवडे यांच्या घरातच शाळा भरायची. या शाळेचे पहिले शिक्षक झुंबरराव क्षीरसागर. याच परिसरातील रंगनाथ देशमुख यांनी शाळेला तीन गुंठे जमीन दिली. ही जागा मिळाल्यानंतर चिंभळा मढेवडगाव रस्त्यालगत देशमुख यांनी दिलेल्या जागेत झोपडीत शाळा भरू लागली. पुढे या शाळेचे नाव देशमुखवस्ती शाळा असे झाले. पहिले शिक्षक झुंबरराव क्षीरसागर व सरपंच महादेव उंडे यांनी ग्रामपंचायत व लोकवर्गणीतून दगड मातीतून एक खोली बांधली. त्यात अनेक विद्यार्थी घडले. सरपंच स्व. सुदाम पवार, उपसरपंच ज्ञानदेव गवते यांच्या प्रयत्नातून शाळेची आणखी खोली उभी राहिली. त्यानंतर सुनिल शिंदे व आप्पासाहेब फापाळे या शिक्षकांनी परिश्रम घेऊन शाळेचे रुपडे पालटविण्याच्या प्रयत्न केला. संरक्षक भिंतीची एक बाजू, एक वर्गखोली, वृक्षारोपण व विविध उपक्रम राबवून त्यांनी ही शाळा पुढे आणली. १ जून २०१३ रोजी रामदास ठाकर हे शिक्षक या शाळेत आले. सुकदेव पानसरे हे सहशिक्षक म्हणून लाभले. ठाकर यांनी तब्बल ११ वर्षे अथक परिश्रम घेऊन पहिली गोदानगर (शेडगाव) शाळा ग्रामस्थांच्या मदतीने नावारुपाला आणली. त्यांच्या या कार्याचा गौरव राष्ट्रपतींच्या हस्ते झाला. देशाचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले रामदास ठाकर या शाळेवर हजर झाले. यावेळी शाळेची पटसंख्या ३२ च्या आसपास होती. ठाकर यांनी आदिवासी समाजातील मुलांच्या घरी स्वत : भेटी दिल्या. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. जादा तास घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कष्ट उपसले. लोकवर्गणीतून शाळेच्या क्रीडांगणाची निमिर्ती राहुल निंबाळकर, सुदाम थोरात यांनी तब्बल १५० ट्रेलर मुरूम दिला.

विक्रम क्षिरसागर, मोहन शिर्के, पांडुरंग उंडे, आप्पासाहेब काळे, सतीष नागवडे, विठ्ठल गलांडे, नितीन रोहकले, प्रभाकर गाडेकर यांनी आर्थिक योगदान दिले . त्यानंतर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. रंगनाथ देशमुख यांनी दोन गुंठे जागा शाळेस दान केली. संजय काटे यांनी ४ हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ दिला. ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच तेजमल धारकर यांनी संरक्षक भिंत बांधून दिली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, पं. स. सदस्या अनुराधा नागवडे यांच्या सहकार्यातून एक वर्गखोली बांधण्यात आली. अंगणवाडीची इमारत, मुलांना बसण्यासाठी बाकी मिळाले. संगणक, टेलिव्हिजन संच, डिश सेवा, स्वाध्याय कट्टे, स्वच्छता संकुल, विद्युत पंप या सुविधा लोकसहभागातून मिळविल्या. अद्ययावत स्मार्ट क्लासरूम, सभामंच, सुसज्ज कार्यालय, पेव्हींग ब्लॉक, एलईडी संच, राष्ट्रीय प्रतिके प्रतिकृती, ध्वजस्तंभ, साऊंड सिस्टिम, होम थिएटर, शाळेला एकच रंग या सुविधाही लोकसहभागातून मिळाल्या.

आमदार राहुल जगताप यांनी शाळेच्या स्मार्ट क्लासरूमसाठी एलईडी प्रोजेक्टर व शामराव जगताप यांनी ग्रंथालयासाठी ५०० पुस्तके शाळेस दिली. विविध शिष्यवृत्ती परिक्षा, शैक्षणिक साहित्य निमिर्ती कार्यशाळा, क्रीडास्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा हे सर्व उपक्रम राबविले. अनेक विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत चमकले आहेत.

माजी विद्यार्थी डॉ.संतोष देशमुख हे अहमदनगर येथील महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. ते स्वत: आता विविध विषयावर संशोधन करत आहेत. सुलोचना पाटोळे या कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. संदीप वाबळे, अनिल गोरे, अभिषेक काटे, ऋतुराज काटे, शुभम गायकवाड, संकेत नागवडे यांनी शाळेचे नाव उंचावले आहे. आज देशमुखवस्तीची शाळा आदर्श शाळा बनली आहे. आयएसओ मानांकनही शाळेला प्राप्त झाले आहे. शाळेच्या गगनभरारीमध्ये मा. अध्यक्ष सुनिल मासाळ. दिलावर सय्यद, संतोष पठारे, अध्यक्ष ज्ञानेश्वर गुणवरे, उपाध्यक्ष केशव वाबळे यांचाही मोलाचा वाटा आहे. श्रमदान, आर्थिक योगदान व कष्टातून ही शाळा उपक्रमशील शाळा म्हणून पुढे येत आहे. या कामात महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे, शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, आबासाहेब मोरे, गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे, ज्ञानेश्वर कलगुंडे, अनिल शिंदे, केंद्रप्रमुख रामदास मेहेत्रे, कोंडीबा झावरे, प्रा. फुलसिंग मांडे, प्रा. एन. टी. पवार, प्रा. ऋषिकेश जगताप, प्रा. धनंजय सोमवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच गावातील सुभाष सोमवंशी, विशाल सोमवंशी, सरपंच भानुदास सोमवंशी, उपसरपंच बबनराव वाबळे, संभाजीराव सोमवंशी, प्रल्हाद सोमवंशी, संजय सोमवंशी, राजेंद्र देशमुख, दत्तात्रय ढवण, नंदकुमार गाडेकर, बाळासाहेब लबडे, जयसिंग गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, रमेश गायकवाड, गोरख गायकवाड, रामदास वाबळे, दीपक मांडे, दत्तात्रय मांडे, प्रमोद गाडे, बाळासाहेब फापाळे, डॉ.लक्ष्मणराव गवते, जगन्नाथ पाटोळे, शरीफ शेख, उत्तम मांडे, सोमनाथ फरकांडे, नानासाहेब चांदगुडे, शंकर सोमवंशी, सिताराम वाबळे, सलीम पठाण, महादेव ढवन, बाळासाहेब जगताप, अनिल सोमवंशी, भाऊ गायकवाड, अशोक कुलांगे, सोमनाथ चांदगुडे, अमोल जाधव यांची मदत मिळाली.

(प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशित झाले त्या वेळेतील आहे)

शब्दांकन: संजय काटे, सकाळ प्रतिनिधी..
                                    स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading