“कोविड – १९” जनजागृती व घरी बनवलेल्या फेस मास्कचे वितरण सुरू.

दिनांक २ मे (काष्टी,श्रीगोंदा):

कोविड – १९ लॉकडाउनच्या काळात काष्टी येथील बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या ‘परिक्रमा’ शैक्षणिक संकुलातील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “कोविड – १९” विषयी जनजागृती सुरू केली आहे.तसेच विद्यार्थिनी कु. रोहिणी चिरके आणि कु. प्रगती जगताप यांनी स्वतः घरी फेस मास्क बनवून समाजात गरजूवंत लोकांना वितरित करत आहेत. त्याच बरोबर ह्या आजारा विषयीची माहिती सुद्धा देत आहेत.

सामाजीक बांधिलकी जपून हे विद्यार्थी डॉ. नितीन करमळकर (कुलगुरू), डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. संतोष परचुरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा धनंजय लांडगे, महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा.जयदीप पवार तसेच प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांच्या मार्गदर्शनानुसार काम करत आहेत.

ह्या स्तुत्य उपक्रमाचे परिक्रमा संकुलाचे संचालक प्रतापसिंह पाचपुते यांनी अभिनंदन केले असुन, विद्यार्थ्यांना जी मदत लागेल ती देण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading