दिनांक २ मे,श्रीगोंदा:
मागील रब्बी आवर्तनाच्या वेळी तालुक्यात कुकडी कालव्याचे पाणी भरपूर मिळाले.त्याचे श्रेय आ. पाचपुते यांनी घेतले.आता उन्हाळी आवर्तनात तालुक्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहीला. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी प्रायश्चित्त घ्यावे.असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आ. बबनराव पाचपुते यांना दिले आहे.
कुकडी कालव्याचे रब्बीचे आवर्तन दि. १ जानेवारी २० रोजी सुटले.त्यावेळी शेतक-यांना पाण्याची फारशी आवश्यकता नसल्याने, तालुक्यातील सर्व तलावात पाणी सोडण्यात आले. नदी नाल्यांना पाणी दिले गेले.त्यावेळी आ. पाचपुते यांनी त्याचे श्रेय घेतलं.तर,समर्थकांनी स्लोगण तयार केल्या. काही जणतर याचसाठी केला होता अट्टाहास,इथं पर्यन्त पोहोचले.
नुकतंच कुकडी कालव्याचे उन्हाळी आवर्तन पार पडलं.हे आवर्तन सुरू असताना आ.पाचपुतें यांचे WhatsApp व facebook वर तीन व्हीडीओ संदेश प्रसिद्ध झाले.त्यात पहिल्याच संदेशात त्यांनी आपण आवर्तनावर लक्ष ठेवून कर्मचारी, अधिकारी व पदाधिकारी यांचे सतत संपर्कात असुन,कोणीही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही. तालुक्यातील सर्व तलाव पाण्याने भरून घेतले जातील व तुमची शेती फुलविण्याची जबाबदारी पार पाडली जाईल.अशी भीमगर्जना केली.
हा संदेश पाहून पाणी देण्याची जबाबदारी आमदारांचीच असते.आणी ती पार पाडण्याची त्यांनी घोषणा केली.म्हणून,उन्हाळ्यात शेतक-यांना पाण्याची खुप गरज असते.त्यासाठी मीही लगेच याबाबत कुठलेही राजकारण डोक्यात न ठेवता सहकार्याची भुमिका घेतली.मी किंवा आमचे सहकारी या आवर्तनात हस्तक्षेप करणार नाहीत.उलटपक्षी गरज पडेल तेथे सहकार्यच करू. अशी घोषणा केली तश्याच प्रकारे सर्वांनी वर्तनही केले.
या आवर्तनाचा उडालेला फज्जा पाहता व शेतकऱ्यांवर होणारा अन्याय कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी सहन केला नसता व तीव्र स्वरुपाच्या आंदोलनाला सामोरे जावे लागले असते.मात्र,करोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असणारा लॉकडाऊन व शासन नियमांचे पालन शेतकऱ्यांनी करुन मोठा संयम दाखविला. मात्र,श्रीगोंदा तालुक्यातील शेतक-यांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. आ. पाचपुते हे कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी कधीच गंभीर नसतात.मात्र दुस-याने केलेल्या चांगल्या कामाच श्रेय घेण्यासाठी आघाडीवर असतात.सुडाचे राजकारण कायम करत राहतात. त्याचाच भाग म्हणून त्यांना ज्या गावात मतांची आघाडी मिळाली नाही.अशा गावांना पाणी मिळणार नाही. असा प्रयत्न आ. पाचपुते यांनी केला.
आमदारांनी कालवा सल्लागार समिती मध्ये पाण्याचे नियोजन करायला पाहिजे व ठरलेल्या नियोजनाची अंमलबजावणी अधिकारी व कर्मचारी यांना करू दिली पाहीजे. त्यात कोणी चुकला त्याला जबाबदार धरले पाहीजे अशी पद्धती राज्यभर आहे. मात्र,तालुक्यात तसे न होता गेल्या अनेक वर्षांपासून आ.पाचपुते यांचा पाणी प्रश्नी चुकीच्या पध्दतीने हस्तक्षेप होत असतो. त्यामुळे कायम तालुक्यात पाणी प्रश्नी अन्याय होतो ते आमदार काय ? ते पालकमंत्री असताना देखील त्यांना या प्रश्नी कधीच न्याय देता आला नाही.तेच याही वेळी घडलं. ऐन उन्हाळ्यात पिकांना पाण्याची नितांत गरज असताना,अनेक गावातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहीले आणि त्यामुळे त्यांचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. याला केवळ आ.बबनराव पाचपुते हेच जबाबदार आहेत.त्यांनी आपली जबाबदारी झटकण्यासाठी मी विरोधीपक्षाचा आमदार आहे.त्यामुळे अधिकारी चुकीचे वागत आहेत.त्यांचे विरोधात हक्कभंग आणणार अशी वल्गना केली. हिम्मत असेल तर त्यांनी हक्कभंग आणून दुध का दुध और पाणी का पाणी करून दाखवावं.जर पाणी सर्वांना मिळालं तर तुमच्यामुळं, अडचण झाली की बोट अधिकारी व सरकारकडे हा कांगावा तुमचा कायमचाच.
जस चांगलं झाल्यावर श्रेय घेता.तस आता तालुक्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहीला आहे.याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आ.बबनराव पाचपुते यांनी प्रायश्चित्त घ्यावे असे आव्हान श्री.शेलार यांनी दिलं आहे .
