दिनांक १ मे,श्रीगोंदा:
तालुक्यातील देऊळगाव येथे बरीच गरीब कुटुंबं वास्तव्य करत आहेत. लॉकडाऊनच्या परिस्थितीत कोणीही कामाला जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या मुलांचा सांभाळ ते कसे करू शकतात? असा प्रश्न प्रहारचे युवक तालुकाध्यक्ष अजित गायकवाड यांना पडला. त्या दृष्टीने यांनी विचार केला.पीडित कुटुंबातील लोकांची मदत केली पाहिजे.
म्हणून, गरिब, कामगार, महिला, दिव्यांग व्यक्तींसाठी सतत प्रयत्न करणारे प्रहारचे प्रथम शहरध्यक्ष तथा पत्रकार नितीन रोही यांच्या ३ मे या वाढदिवसानिमित्त तसेच अजय बारस्कर (प्रदेश अध्यक्ष प्रहार संघटना),संतोष पवार (राज्य उपअध्यक्ष प्रहार संघटना) विनोद परदेशी (जिल्हाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच (तहसीलदार) महेंद्र माळी व पोलीस निरीक्षकांच्या सूचनेचे पालन करून प्रहारचे नेते वामन भदे, (दिव्यांग तालुका अध्यक्ष) राजेंद्र पोकळे,(जिल्हा संघटक) साहेबराव रासकर, (तालुका अध्यक्ष) कृष्णा खामकर यांच्या नेतृत्वाखाली गरीब ५० कुटुंबांना किराणा मालाचे वाटप (प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका उपाध्यक्ष) सुरेश गलांडे,अजित गायकवाड यांच्या हस्ते केले.
यावेळी युवक अध्यक्ष गुरु उर्फ संतोष गायकवाड, प्रहार सचिव भैलूमे साहेब,किरण नवले (अध्यक्ष जगदंब प्रतिष्ठान) तात्याशेठ नलगे ,कृष्णा भाऊ मठारे,अक्षय गायकवाड, नितीन कांबळे, विश्वास सुडगे, सद्दाम सय्यद उपस्थित होते.
तालुक्यात नितीन रोही यांचे बरेच सतकार्य आहे. त्यांनी शहर अध्यक्ष म्हणून,तालुक्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.रोही हे गवंडी काम करीत असताना,त्यांना समाज सेवेचं वेड लागलं, ते अवघे २३ वर्षांचे आहेत. आता ते २४ वर्षांत पदार्पण करीत असून, तालुक्यातील प्रहारचे कार्यकर्ते रोहीनां त्यांच्या गळ्यातील ताईत समजतात.
