प्रिय राजकारणी,
आपण घरात बसुन स्वतची व कुटुंबाची काळजी घेत असाल अशी आशा करतो. कोरोना या महामारिचे संकट संपुर्ण विश्वावर आले आहे. चीन सारख्या देशात तयार झालेला कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. आपल्या देशात कोरोनाचे संक्रमण परदेशातून आलेल्या लोकांकडून झाले आहे. जो वर्ग या देशात कधीच मतदान करत नाही. कदाचित तुम्हाला तो निवडणुकीसाठी पैसा पूरवत असेल,म्हणून तुम्हाला तो जवळचा वाटत असेल. आम्हाला त्यांच्या बद्दल आकस असण्याचे कारण अजिबात नाही. पण त्यांच्यामुळे देशात कोरोना पसरला हे वास्तव पण विसरता येत नाही. एवढ असुन सुद्धा परदेशात अडकलेल्या या लोकांना आपण विमानाने परत घेउन आलात. येनाऱ्या प्रतेकाला सुरक्षित ठिकानी १४ दिवस क्वारंटाईन करुन ठेवले असते,तर देशात कोरोनाने जेवढे आज थैमान घातले आहे.तेवढे नक्किच घातले नसते. असो तो मुद्दा नाही.
जगभरातून ज्यांना कोरोना असण्याची जास्त शक्यता आहे.अशा नागरिकांना आपण विमानाने घेउन आलात.परंतू,या देशातील कष्टकरी, कामगार ,सामान्य गरिब आपण हजारो किलोमीटर आया,बापड्या, पोरासोबत संसाराचे गाठोडे डोक्यावर घेउन चालायला लावलास, आपल्या बाळाने रस्त्यवर चालताना जीव सोडला,त्या अभागी आईला मृत बाळाचे शरीर हातात घेउन चालताना देशाने पाहिले आहे. हाच तो कामगार सामन्य गरिब कष्टकरी समूह आहे. ज्याला तुमच्या ग्रामपंचायत ते आमदारकी खाजदारकिच्या निवडणुकी वेळी गाडी पाठवून आणले जाते, आल्यावर पैसे देतो म्हणून बोलावून घेतले जाते,तो मतदान करतो,जमल तर तुमचा बगल बच्चा त्याला दिलेले अर्धे पैसे खिशात घालुन राहिलेले त्याच्या हातात देतो.
हाच गोरगरीब कष्टकरी सामन्य कामगार शहरात झोपडपटयामध्ये तर खेडेगावात गावकुसाबाहेर राहुन सर्वात जास्त उत्साहाने तुम्हाला मतदान करतो. तो तुमच्या प्रचारात सुद्धा आघाडीवर असतो. खर आहे की तो तुमच्या गोड बोलण्याला, तुमच्या सोबतच्या सेल्फी ला,तुमच्या पाठीवरच्या दिखाव हाताला, निवडणुकी पुरत्या मटण दारुच्या पार्टीला व तुमच्या खोट्या आश्वासनाला बळी पडलेला असतो.त्यात त्याची चुक आहेच हे मी कबूल करतो.तो आपल्या मताची किंमत मिठ मिरची सारखी करतो आहे.याची त्याला कधितरी जाणिव होईलच.पण,तुम्हाला मात्र त्याच्या मताची किंमत चांगलीच माहीत आहे. म्हणून तर तुम्ही मतदानाच्या आदल्या दिवशी एका मताला परिस्थितिनुसार शंभर पासून ते हजार पर्यंत वेळप्रंसंगी जास्त सुद्धा देऊन त्याची बोळवण करता. तुमची ती निवडणुकीसाठीची इन्वेस्टमेंटच आम्ही मान्य करतो. तो इन्वेस्ट केलेला पैसा म्हणजे अस्वलाच्या अंगावरील केस हे तुम्ही खाजगीत मान्य पण करता.हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत माहित आहे.
आज मात्र,कोरोना या महामारी सोबत संपुर्ण जग लढत असताना,हातावर पोटं असणारा गोरगरीब कष्टकरी,गरिब कामगार तुमचा हक्काचा मतदार हवालदील झाला आहे.तो कोलमडला आहे,उपासमारीमुळे भूकबळी च्या दारी पोहचला आहे. देशातील लॉक डॉऊन पुढचे काही महिने असेच राहिले व कोरोनाचा प्रसार यामुळे काय होईल ? याची कल्पना करु शकत नाही.पण ते किती भयंकर असेल? म्हणून,तुमच्या या हक्काच्या मतदाराला वाचवण्यासाठी,ज्यांच्यामुळे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य पासून सरपंच,उपसरपंच,पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, महापौर आमदार, खाजदार, मंत्री, प्रधानमंत्री ते राष्ट्रपती झालात. किंवा हे सर्व होण्याची स्वप्न पाहतात. मागच्या निवडणुकीत काही मतानी तुमची संधी हुकली आहे.ती पुढे तुम्हाला मिळनारच आहे. म्हणून आपण सर्वांनी या गोरगरीब कष्टकरी कामगार मग तो शहरी असो की खेडेगावातील , गावकुसाबाहेरील यांच्या पाठीशी उभे राहुन फक्त फोटो काढण्यासाठी नाही.तर मनापासून मदत केली तर,नक्किच हा वर्ग तुमच्या पाठीशी उभा राहिल. माणुसकीच्या भावनेने जमत नसेल तर निवडणूकीची तयारी समजून लोकांच्या पाठीशी उभे रहावे. निम्म्या रात्री दरवाज्या वाजवून तुम्ही किंवा तुमचे बगल बच्चे मदत करतील ही आशा. सरकारी मदत तिच्या चौकटीत राहुन होईलच हे सर्व मी तुमच्या वयक्तिक खर्चातून करावे ही अपेक्षा. बाकी कर्जबुडव्यांची कर्जमाफी हा विषय थोडा वेळ बाजुला ठेऊ.पण आपला हक्काचा मतदार जगवण्यासाठी खलील दहासुत्री उपाय करावेत ही नम्र विनंती.
1.शहरांमध्ये अडकलेल्या लोकांची गावी येण्याची सोय होत नाही.तोपर्यंत तुमच्या वार्ड मतदार संघातील लोकांची लिस्ट काढून त्यांना अन्न-धान्य, औषधे या जीवन आवश्यक सेवा पोहचवणे.
2.सरकारी आदेश आल्यावर स्वत:च्या गाड्या पाठवून त्यांना गावी घेउन येणे. तसेच महिना पंधरा दिवस त्यांना क्वारंटाईन करुन त्यांची खाण्याची सोय करणे.
3. प्रत्येक गरजुंच्या घरात मताप्रमणे (तुमचा हिशोब आहे म्हणून) रोख रक्कम देणे.
4.तुमच्या मतदार संघात तुमची पकड असतेच त्यामूळे जे दुकानदार व्यावसायीक लोकांना लुटत आहेत त्यांना तुमच्या भाषेत समजावने.
5.प्रशासन पोलिस यामध्ये सेटलमेंट साठी तुमचे जाणे-येणे असल्यामूळे तुमच्या शब्दाला तिथे खुप जास्त किंमत असते,त्याचा उपयोग करुन दारु-जुगार कमीत कमी या कोरोनाच्या काळात तरी बंद करणे.
6.मास्क,सेनिटाइज़र व साबण याचे वाटप करणे.
7.निवडणुकीच्या काळाप्रमाणे गावो गावी जेवणाच्या पंक्ति ठेवणे.नेहमीप्रमाणे बोकडाच्या पार्ट्या न ठेवता पोळी-भाजी,भात जरी ठेवला तरी चालेल. अडकलेले लोक व गरजू यांना याचा नक्की फायदा होईल.
8. लॉकडाउन मुळे दवाखान्यात जायला वाहनांची व्यवस्था होत नाही,अम्बुलँस मिळणे कठिण झाले आहे तेंव्हा तुमच्या स्वत:च्या किन्वा कार्यकर्त्यांच्या गाड्या उपलब्ध करणे.
9.शक्य असेल तर आपल्या कार्यकर्त्यांना आसपासच्या गरजूंची मदत करायला सांगा.
10.निवडणुकीच्या आधी प्रतेक उमेदवार हक्काचा मतदार ,काठावरचा,आपला नसनारा अशी लिस्ट काढतो त्याप्रमाणे कमितकमी तुमच्या पाठिमागे असणाराला व काठावरचा यांना तरी मदत करा.
टीप:-
1. कुठलेही राजकारण न करता सामन्या गरिब कष्टकरी कामगार शेतकरी यांच्यासाठी काम करणारे राजकारणी त्यांना सलामच.
2. राजकारण्यांच्या उत्पन्न व त्याचे श्रोत हा पत्राच्या बाहेरील विषय आहे.
3. हे पत्र अत्यंत पर्सनल असून फक्त तुमच्यासाठी आहे. यामध्ये आजी माजी सर्वच सक्षम असणारे ग्रामपंचायत सदस्य पासूनसरपंच,उपसरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, महापौर आमदार, खाजदार, मंत्री, प्रधानमंत्री ते राष्ट्रपती आणि हे सर्व होण्याची स्वप्न पाहणारे. मागच्या निवडणुकीत काही मतानी संधी हुकलेले राजकारणी च्या व्याख्येत आहेत. यामध्ये आजी लोकानी जास्त मनावर घ्यावे.
