सौ.अनुराधा नागवडे यांचा शिवसेनेत प्रवेश, विधानसभा निवडणुकीसाठी मोठे पाऊल.. उद्या मुंबईत अधिकृत प्रवेश सोहळा होणारं संपन्न..

अनुराधा नागवडे शिवसेनेत प्रवेश, महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढणार..

दिनांक २२ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आणि लोकभावनेनुसार जिल्हा सहकारी बँक संचालिका सौ. अनुराधा राजेंद्र नागवडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या वतीने आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अधिकृत प्रवेश सोहळा उद्या बुधवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी २:०० वाजता मुंबई येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी केले आहे.

राजेंद्र नागवडे यांनी स्पष्ट केले की, मतदारसंघातील अनेक प्रलंबित विकासकामे, लोकांची शासकीय कार्यालयात होणारी अडवणूक आणि नागरिकांच्या समस्यांमुळे विधानसभा निवडणूक लढविण्याची मागणी लोकांमध्ये वाढली होती. त्याचबरोबर मागील तीन वर्षांपासून हा निर्णय घेतला गेला होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. ज्येष्ठ नेते सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन बाबासाहेब भोस, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, आणि दिपक नागवडे यांच्याशी चर्चा करून शिवसेना पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय झाला.

या प्रवेश सोहळ्यासाठी नागवडे कुटुंबाने आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीवरून)

Adv.

Leave a Reply