विरोधक फक्त आमदार पाचपुते यांच्यावरच बोलतात…. विक्रम पाचपुते

दिनांक १३ नोव्हेंबर २०२४,कोळगाव, श्रीगोंदा:

विरोधक फक्त पाचपुते यांच्यावरती बोलतात त्यांना बोलण्यासारखे काही नाही राहिले. आमदार पाचपुते श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केले आहेत. आमदार पाचपुते यांनी केलेली विकास कामे प्रत्येक गावात व तालुक्यात आणखी पुढे नेण्यासाठी मला आशीर्वाद द्यावेत असे आवाहन महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी कोळगाव येथील बाजार निमित्ताने झालेल्या जाहीर सभेत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद नवले हे होते.

कोळगावच्या बाजाराच्या औचित्य साधून महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, कोणी १५ वर्षानंतर तर कोणी १० वर्षानंतर विधानसभेची उमेदवारी करत आहे.

विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आमदार पाचपुते यांनी केलेल्या विकास कामावर बोलणार आहे असे सांगितले .आमदार पाचपुते यांनी गेल्या ४० वर्षात सात वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुका जिंकून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. कोरोना काळात आमदार पाचपुते आजारी असताना ज्यावेळी मंत्रालयात जाऊन विकास कामांचे आदेश घेऊन येताना त्या पत्रावर तेथील अधिकारी आमदार पाचपुते यांचे काम आहे म्हणून लगेच आपुलकीने चौकशी करून सही करायचे ही आमदार पाचपुते यांची कामाची पावती मला तेथे पाहायला मिळाली.

आमदार पाचपुते यांनी प्रत्येक गावात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे. कोळगाव आणि परिसरात सुद्धा विविध प्रकारचे रस्ते, पाणी, वीज रोहित्र, पथदिवे बसविणे अशी अनेक कामे केली. ज्या सभा मंडपात विरोधक बबनराव पाचपुते यांच्यावर आरोप करतात तो सभा मंडप पाचपुते यांनीच बांधलेला असायचा हेही ते मान्य करायचे.

कोळगाव येथील सरपंच पुरुषोत्तम लगड यांचे कार्य उल्लेखनीय असून अनेक कोटींचे विकास कामे या परिसरात खासदार सुजय विखे व आमदार बबन पाचपुते यांच्या माध्यमातून खेचून आणले आहेत. त्यामुळे कोळगाव चे स्वरूप बदलत आहे. गावचा कार्यकर्ता जर चिवट असेल तर गावचा विकास गतीने होत.  हे कोळगाव मधील कार्यकर्त्यांकडे पाहून कळते.

यावेळी, सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी कोळगाव व परिसरात विविध विकास कामे आमदार पाचपुते यांनी पूर्ण केली असून अजूनही कोट्यावधींची विकास कामे या पुढील काळात पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

कोळगावचा कायापालट जर करायचा असेल तर विक्रम पाचपुते यांना परिसरातून अधिक मताधिक्य देण्याचे आवाहन या निमित्ताने केले. नितीन नलगे, मिठू शिरसाठ, धोंडीबा लगड यांनी आपली मनोगत व्यक्त केली.

या कार्यक्रमास रयत क्रांती संघटनेचे भाऊसाहेब मांडे, शरद नवले, कोळगावचे उपसरपंच संतोष मेहत्रे, दादासाहेब लगड, ईश्वर गुरुजी, विलास शितोळे, महेंद्र रणसिंग, नंदू लगड, गणेश लगड, गोटू लगड रमेश नलगे, सुधाकर लगड ,राहुल लगड, शिवाजी लगड, दिलीप लगड, सुदाम तोंडे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होत.  या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाजपचे प्रदेश सरचिटणीस संतोष लगड यांनी केले.

स्रोत: (पत्रकार महेश शिंदे)

जाहिरात ..

Leave a Reply