श्रीगोंद्यात १६ नोव्हेंबर रोजी उमेदवार अण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ ॲड.प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा..

दिनांक १३ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा नगर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड.प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब हे १६ नोव्हेंबर २०२४ रोजी श्रीगोंदा येथे दुपारी २:०० वाजता संत शेख महंमद बाबा दर्गाह समोरील प्रांगणात जाहीर सभा घेणार आहेत. याबाबत अण्णासाहेब शेलार आणि वंचितचे प्रदेश प्रवक्ते, ॲड.अरुण जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यावेळी अण्णासाहेब शेलार यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, गरीब मराठा, उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित, कष्टकरी, शेतकरी आणि मागासवर्गीय बांधव त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत. यामुळे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा त्यांना विश्वास आहे. जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीचा अनुभव असल्यामुळे, विधानसभा निवडणुकीत यश मिळवणे सोपे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सभेसाठी सुरेखा पुणेकर, किसन चव्हाण, अरुण जाधव आणि तालुक्यातील ओबीसी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, संत शेख महंमद बाबांच्या दर्ग्यासमोर शपथ घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आणि ते कोणाच्याही प्रभावाखाली निवडणूक लढवत नसल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीगोंदा मतदारसंघातील प्रस्थापित राजकारण्यांच्या सत्तेचे विडंबन करीत शेलार म्हणाले की, २५-३० वर्षांच्या सत्ताधारी बदलांनंतरही येथील समस्या सुटल्या नाहीत. पाणीपुरवठा, अधिकाऱ्यांचे दिरंगाईचे काम आणि एमआयडीसीसंबंधीचे मुद्दे प्रलंबित आहेत. याच कारखादांराना सभेसाठी रोजंदारीवर कार्यकर्ते आणावे लागत आहेत, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत “साखर विरुद्ध भाकर” अशा प्रकारची स्पर्धा दिसून येईल असे त्यांनी प्रतिपादन केले.

शेलार यांनी आत्मविश्वासाने म्हटले की, या निवडणुकीत प्रस्थापित राजकारण्यांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला असला तरी सामान्य जनता त्यांना योग्य न्याय देईल.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते अरुण जाधव यांनी जरांगे फॅक्टरवर बोलले. ॲड. आंबेडकरांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले होते, मात्र जरांगे यांनी ओबीसीतुन आरक्षनाचा हट्ट सोडला नाही.. असे त्यांनी नमूद केले.

या पत्रकार परिषदेस अण्णासाहेब शेलार, अरुण जाधव, संतोष भोसले, ओंकार शिंदे, ओहळ, राऊत आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

स्रोत:(पत्रकार परिषद)

जाहिरात

Leave a Reply