श्रीगोंदा विधानसभेत गोरख आळेकरांचे थेट आगमन; पाचपुते-नागवडे लढतीला नव्या ट्विस्टची जोड…

दिनांक २ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापित पाचपुते विरुद्ध नागवडे यांच्या लढतीला एका नव्या ट्विस्टची जोड मिळाली आहे. सामाजिक कार्यकर्ते गोरख आळेकर यांनी लोकशाही जनहित पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यांचे या निवडणुकीतील आव्हान प्रस्थापितांसाठी नवी धास्ती ठरणार आहे.

कोण आहेत गोरख आळेकर?

गोरख आळेकर हे एक आक्रमक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख असून, ते सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपली आग्रही भूमिका मांडत असतात. त्यांच्या लढाऊ व संघर्षशील भूमिकेमुळे आळेकर हे नेहमीच चर्चेत राहतात. विस्थापित समाजाच्या न्यायासाठी आवाज उठवण्याची आणि सामान्यांसाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावण्याची त्यांची तयारी असते.

गोरख आळेकरांच्या मतानुसार, श्रीगोंदा मतदारसंघात विस्थापित समाजाला अद्याप योग्य राजकीय न्याय मिळालेला नाही.८ जिल्हा परिषद गट, १६ पंचायत समितीचे गट आणि ग्रामपंचायती कोणाच्या ताब्यात आहेत? साखर कारखाने आणि सहकारी बँक कोणाच्या हातात आहेत? या प्रश्नांची उत्तरे समाजाला जागृत करायला लावणार असल्याचे आळेकरांनी सांगितले आहे. त्यांच्या मते, यावेळी विस्थापित समाज आळेकरांना मतदान करणार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत आपला स्वतःचा पॅनल तयार करणार आहे, ज्यात सर्व घटकांचा समावेश असणार आहे.

गोरख आळेकर हे कायमच जनतेसाठी लढत असतात. कुकडी पाणी प्रश्नावर रस्ता रोको आंदोलन करत शेतकऱ्यांसाठी पाणी मिळवले, प्रसंगी पाच दिवस उपोषण करून त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून दिले. लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. तसेच, सरस्वती नदीचे खोलीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी मोठे कार्य उभे केले आहे. आळेकरांच्या आवाजात असलेल्या दमामुळे अधिकाऱ्यांना धारेवर धरून सामान्यांच्या न्यायाची सोय करून दिली आहे.

व्हिडिओ.. पहा..

गोरख आळेकर यांचे श्रीगोंदा मतदारसंघातील तरुणांमध्ये मोठे संघटन आहे. त्यांच्या एका आवाहनावर शेकडो तरुण त्यांच्या पाठीशी उभे राहतात. आळेकर यांचा विश्वास आहे की विधानसभा निवडून गेल्यानंतर ते श्रीगोंदा तालुक्यातील युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.

गोरख आळेकर यांच्या उमेदवारीमुळे श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत एक वेगळा रंग भरला आहे. ते निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचल्यास विस्थापित समाज आणि तरुणांचे प्रश्न मार्गी लागतील, असा त्यांचा विश्वास आहे.

स्रोत:(अधीकृत माहितीनुसार)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading