लोणीव्यंकनाथ हे कुकडी लाभक्षेत्रातील सुमारे ९ हजार लोकसंख्येचे गाव. कुकडीच्या पाण्यामुळे उसाचे मळे बहरले होते. पाटपाण्याचा अवमेळ सुरू झाला आणि शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहीले अशा परिस्थितीत लोणीव्यंकनाथ पांडुरंग गजाबा काकडे व जब्बार कलंदर इनामदार यांनी स्वत: च्या शेतीला आकार देत असताना गावातील अनेक तरुणांना किफायतशीर शेताचे निस्वार्थपणे धडे दिले. या कृषी दुतांच्या मार्गदर्शनाने अनेक तरुणांना शेतीत करिअर करण्याबाबत सुर गवसला आहे.
पांडुरंग गजाबा काकडे यांना १३ एकर शेती असून सहा सदस्यांचे कुंटुब आहे. पत्नी रुपाली हिची शेतीत मोठी साथ लाभली. राहुल व रोहीत दोन मुल असुन राहुल महाविद्यालयीन शिक्षणास रामराम ठोकला. रोहीत हा बी. एस्सी. ॲग्री करत आहे. मुलगी रेश्मा हीने बी ई पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आहे. जब्बार कलंदर इनामदार यांना साडे सात एकर शेती असून २४ सदस्याचे जम्बो कुंटूब आहे. वडील कलंदर भाई नागवडे सहकारी साखर कारखान्यात नोकरीस होते. जब्बार यांची पत्नी आनीसाह गृहीणी आहेत मुल जिशान व मुलगी निदा हे लहान आहेत.
लोणीव्यंकनाथ गावचे २ हजार ५२४ हेक्टर क्षेत्र आणि ४ हजार ३०० खातेदार शेतकरी दोन सहकारी सोसायट्या एक राष्ट्रीयकृत बॅक त्यामुळे शेतीसाठी कर्ज घेण्याची सुलभ प्रकिया गावात शेती करण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले पण मार्गदर्शनाचा अभाव होता. कुकडी आणि विसापुरच्या पाण्याचा अवमेळ झाला अशा परिस्थितीत पावसानेही लोणीकडे पाच सहा वर्षांपासून वक्रदृष्टी केली आहे आणि ऊस शेतीची कडू कहाणी सुरू झाली. राजकारणातील आणि समाजकारणातील गोडवा संपला. अशा परिस्थितीत जब्बार इनामदार व पांडुरंग काकडे यांनी ऊस शेतीच्या मळ्यात डाळिब कलिंगड खरबुज आणि फुल शेती करण्यास सुरुवात केली आपल्या बरोबर गावातील चार मुलांना कमी कालावधीत जादा पैसे मिळून देणाऱ्या शेतीची गोडी लागावी म्हणून शेतावर जावून मार्गदर्शन सुरू केले. या मार्गदर्शनाने निराशाने घायाळ तरुणाई शेतीत नवे स्वप्न आणि आशा रंगवू लागली.
लोणीव्यंकनाथ गावातील उसाची शेती संपली असून त्या जागेवर डाळिंब, लिंबोणी, भाजीपाला, कलिंगड, खरबुज, फुल शेती ने जागा आहे त्यामुळे गावातील तरुणाईला दिशा आणि अर्थकरणाला नवी ऊर्जा मिळाली आहे शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध होण्यासाठी शेततळ्याची संख्या वाढली मजुरांच्या हाताला रोजगार आणि मशनरीला काम मिळण्याचा राजमार्ग तयार झाला आहे. पांडुरंग काकडे व जब्बार इनामदार यांच्या मुळे तरुण शेतकऱ्यांचा एक गट तयार झाला एकामेकांच्या विचार आचार आणि सहयोगातून शेती बदलत आहे दररोज सकाळी गावात तरुणाई सोबत कृषी मित्र शेतीत काय केले पाहिजे कोणत्या पिकाला लागला भाव मिळेल कोणत्या कंपनीची औषधे खते खरेदी केली पाहिजेत यावर संवाद करतात. त्यामुळे एक कृषी कट्टा तयार झाला भविष्यात लोणीव्यंकनाथ हायटेक शेती करणारे गाव म्हणून आपली ओळख निर्माण करणार आहे. यामध्ये दोन कृषी मित्रांच्या योगदानाची निश्चितच नोंद होणार आहे.
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
