दिनांक २१ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:
विश्व कल्याणाचा विचार जगाला आणि मानवतेला देणारे महान पुरुष भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात श्रीगोंदा शहरात पार पडली.. समाजाच्या पुढाकाराून जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आज श्रीगोंदा येथे सकल जैन संघाच्या संयुक्त विद्यमानाने कल्याण दिवस निमित्त शहरातून भव्य दिव्य अशी भगवान महावीरांची प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी जैन स्थानकांत महावीराच्या जीवनावर महासतीजी अनुप्रेक्षाजी यांचे व्याख्यान झाले. या नंतर सुरेशशेठ भंडारी यांची गौतम प्रसादी झाली. महावीर जयंती निमित्त सदभावना आनंद मंडळाच्या वतीने जंगलात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या मुक्या प्राण्यांसाठी टँकर द्वारे पाणी सोडण्यात आले.
आजच्या जयंती निमित्त सर्व समाज बांधवांनी आनंद साजरा करीत सर्वांना भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या व महासतीजी अनुप्रेक्षाजी यांचे व्याख्यानाने संबंध समाजातील लहान थोर मंत्रमुग्ध झाले.
याठिकाणी विजय बोरा, विजय मुथा, संदिप कोठारी, महाविर पटवा, समीर बोरा यांनी आपले मनोगत व्यक्त करीत जयंतीच्या हार्दिक सदिच्छा व्यक्त केल्या.
स्रोत:(किशोर पल्लीवाल)
