मंथन परीक्षेत महादजी शिंदे इंग्लिश मेडिअम स्कूलचे घवघवीत यश.

दिनांक २३ मे,श्रीगोंदा:

जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन परीक्षेत श्रीगोंदा तेथील महादजी शिंदे इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी स्नेहा बोनगे,अर्णव दरेकर दिग्विजय अधोरे,स्वराज्य भागवत, सृष्टी कोथिंबिरे आणि सिद्धी शिंदे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत गुणवत्ता यादीत बाजी मारली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य रवीशेठ दंडनाईक,तुकाराम दरेकर महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य कन्हेरकर सर, महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल चे प्रभारी प्राचार्य शिंदे सर,पर्यवेक्षिका भोपे मॅडम इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading