दिनांक १५ फेब्रुवारी २०२६,श्रीगोंदा:
रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे यांचा सेवापूर्ती गौरव व कृतज्ञता समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते.
ते म्हणाले की, महाविद्यालयाच्या विकासात प्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी चांगली भर घातली. उर्वरित आयुष्यात त्यांनी पर्यटन करावे. लेखन करावे, अशा शुभेच्छा दिल्या.
आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा धस यांची विशेष उपस्थिती लाभली. ते म्हणाले की, प्राचार्य डॉ. महादेव जरे यांचे व्यक्तिमत्व सामाजिक बांधिलकी जोपासणारे आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून डॉ.महादेव जरे यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झालेली आहे. ऊसतोड कामगाराचा मुलगा प्राचार्य पदापर्यंत जातो, याचा मला सार्थ अभिमान आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस म्हणाले की, प्राचार्य डॉ. महादेव जरे यांचा सेवापूर्ती समारंभ त्यांच्या मातोश्रीसमोर संपन्न होत आहे, म्हणून ते भाग्यवान आहेत. प्राचार्य म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के म्हणाले की, डॉ. जरे हे इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. त्यात त्यांनी काम करावे. ज्ञानाच्या कक्षा अधिक रुंद कराव्यात. अशा शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, मा. राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव प्राचार्य बंडू पवार, नगराध्यक्ष श्रीमती सुनिताताई खेतमाळीस आदींनी भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ. महादेव जरे, सौ. लता जरे यांचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मी या कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, प्राचार्य वामन यांच्या विषयी कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली.
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयामुळेच मी घडलो. ऊसतोड कामगाराचा मी मुलगा त्यामुळे प्रतिकूलता माझ्या आयुष्यात आली. खूप संघर्ष करावा लागला. जीवनात खूप दुःखाचे क्षणही आले. असे ते म्हणाले.
या समारंभासाठी रयतेचे उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, महावीर पटवा, प्राचार्य डॉ. के. एच.शिंदे, प्राचार्य तुकाराम कन्हेरकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, प्राचार्य डॉ. एकनाथ खांदवे, प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. अशोक धुमाळ, प्राचार्य दिलीप भुजबळ, प्राचार्य शहाजी मखरे, उपनगराध्यक्ष अलकाताई अनभुले, संग्राम घोडके, दिलीप तुपे, पत्रकार बाळासाहेब काकडे, पत्रकार पिटर रणसिंग, पत्रकार चंदन घोडके तसेच मित्रपरिवार, आप्तेष्ट, गावाकडची माणसे, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

