दिनांक १४ फेब्रुवारी २०१६ श्रीगोंदा:
रयत शिक्षण संस्थेच्या नामांकित महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश निवृत्ती साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साळवे हे याच महाविद्यालयात उपप्राचार्य आणि भूगोल विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पीएच.डी. मार्गदर्शक असून त्यांच्या नावावर दोन पेटंट्स आणि अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत सहा ग्रंथांचे लेखन केले आहे.

विवेक वाहिनीच्या माध्यमातून समाजसुधारकांच्या वारशावर त्यांनी अनेक प्रबोधनपर व्याख्याने दिली असून, ते पर्यावरण प्रेमी म्हणूनही ओळखले जातात.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुलदादा जगताप, बाबासाहेब भोस, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
