राज्य शासनातर्फे ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५’ स्पर्धा जाहीर..

दिनांक १५ फेब्रुवारी २०२६,अहिल्यानगर:

१५ मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत सन २०२५ च्या कॅलेंडर वर्षासाठी राज्यस्तरीय व विभागीय ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ स्पर्धा जाहीर करण्यात आली असून या विविध श्रेणीतील पुरस्कारांसाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून १५ मार्च २०२६ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

पुरस्काराच्या प्रमुख श्रेणी:
यावर्षी देखील विविध क्षेत्रांतील योगदानासाठी खालीलप्रमाणे पुरस्कार दिले जाणार आहेत:

  • उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
  • उत्कृष्ट लेखन पुरस्कार
  • उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार
  • उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार
  • सोशल मीडिया (समाज माध्यम) पुरस्कार
  • स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार
    अर्जासाठी महत्त्वाच्या बाबी:
  • कालावधी: हे पुरस्कार १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांकनासाठी दिले जातील.
  • अंतिम तारीख: प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२६ आहे.
  • अर्ज कुठे करावा? माहिती व अर्ज नमुने शासनाच्या खालील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत:
  • http://www.maharashtra.gov.in
  • dgipr.maharashtra.gov.in
  • https://mahasamvad.in (ब्लॉग)
    या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुक पत्रकारांनी आपल्या संबंधित विभागीय माहिती कार्यालय/जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संचालक (माहिती) श्री.गोविंद अहंकारी यांनी केले आहे.
Promotional image for Rajdhani Hotel and Lounge featuring Punjabi dishes. Includes two male figures, one wearing traditional attire and the other a sports medal winner. Displays various Punjabi dishes such as paneer tikka and dal tadka.

स्रोत:(जिल्हा माहिती कार्यालय)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading