महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आधार प्रमाणीकरण बाबत,कोळगावात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ.
01 mins
दिनांक १ मार्च(कोळगाव,श्रीगोंदा):
कोळगाव ता श्रीगोंदा येथे मा.जिल्हाधिकारी श्री.राहुल द्विवेदी,सहायक जिल्हाधिकारी श्रीमती असीमा मित्तल,श्री.रेड्डी,उपवनसंरक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २९ फेब्रुवारी रोजी कर्जमुक्ती योजनेबाबत आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
याप्रसंगी तहसीलदार श्रीगोंदा महेंद्र माळी, सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर,यांचेसह कोळगाव सोसायटीचे सचिव,चेअरमन आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
३० सप्टेंबर २०१९ पुर्वी थकित असलेले सुमारे २ लक्ष रुपये पर्यंतचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या बँकाकडून प्रमाणित केलेल्या याद्या वेब पोर्टलवर प्रिंट काढून, आपले सरकार सेवा केंद्र,सर्व ग्रामपंचायत किंवा बँक नोटीस बोर्डवर प्रसिध्द केलेल्या आहेत.
प्रसिद्ध यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांनी आपापल्या गावातील किंवा श्रीगोंदा तालुक्यातील जवळचे कुठल्याही आपले सरकार सेवा केंद्र,सुविधा केंद्र , जिल्हा बँक शाखा,यांचेशी आधार प्रमाणीकरणसाठी संपर्क साधावा अशा सूचना याप्रसंगी मा.जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत.