श्रीगोंदा (प्रतिनिधी) महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते ते म्हणाले की, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठीचे योगदान मोलाचे आहे. विद्यार्थ्यांनो कष्ट करून तुम्ही तुमचे जीवन यशस्वी बनवा, असे ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. बाबासाहेब भोस म्हणाले की, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आज समाज विकसित झाला असे ते म्हणाले.
या समारंभासाठी महाराष्ट्र मौखिक साधन व संकलन अभियानाचे प्रमुख कृष्णा घोलप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले की, थोर पुरुषांना जातीत वाटू नका. थोर पुरुष हा एक विचार आहे. तो जपूया. फुले आंबेडकर यांच्या थोर विचारांमुळेच ते महान बनले. गुलामगिरी ते संविधान या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. शिक्षण हे मूलभूत परिवर्तनाचे माध्यम आहे. आज आपण सुखाचे दिवस अनुभवत आहोत
याला कारण संविधान आहे. संविधान केंद्रित संस्कृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया, असा विचार कृष्णा घोलप यांनी मांडला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. थोर पुरुषांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने थोरांचे विचार आचरणात आणूया, वाचन करून प्रगल्भ होणे हेच थोर पुरुषांना अभिवादन ठरेल, असे ते म्हणाले. बाळासाहेब महाडिक यांनी मोलाचे विचार व्यक्त केले. सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. राजाराम कानडे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य महावीर पटवा, सचिन महाडिक, योगेश भोसले,उपप्राचार्य डॉ. नितीन थोरात, प्रा. रत्नाकर झिटे, प्रा.उषा बोरुडे, रासेयोचे प्रमुख प्रा. भाऊ बुलाखे, प्रा. देवेंद्र बहिरम, डॉ
राहुल गायकवाड, शा. शि. संचालिका प्रा. कल्पना बागुल, प्रा. रमेश थोरात, डॉ. राजेंद्र ठाकरे, डॉ. रावसाहेब काळे, डॉ. हरिभाऊ वाघीरे तसेच महाविद्यालयातील विविध विषयांचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संजय फटे यांनी केले. आभार प्रा.अनिल ढवळे यांनी मानले.
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे यशस्वी आयोजन














Leave a Reply