दिनांक १५ ऑक्टोबर(पेडगाव,श्रीगोंदा):
मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाल्याने पेडगाव मधील अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत.
या आपत्तीमुळे झालेल्या पडझडीत बशीर काझी, शरिफ बागवान, समिर बागवान, भाऊसाहेब घोडके, यांचा समावेश आहे. पेडगाव ग्राम पंचायतचे (सरपंच) भगवान कणसे, (उपसरपंच) देविदास शिर्के व सदस्य राजेंद्र पंडित, इरफान काझी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तर, पीडित कुटुंबांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
स्रोत:(पत्रकार शफीक हवालदार,पेडगाव)
