‘युवा मल्हार सेने’च्या राज्य महिला प्रदेशाध्यक्षपदी मीनाताई राहिंज..

दिनांक १५ ऑक्टोबर,श्रीगोंदा

श्रीगोंदा तालुक्यातील महिलांचे विविध प्रश्न तसेच सामाजिक प्रश्नांमध्ये वंचितांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहणाऱ्या, मीनाताई राहिंज यांची ‘युवा मल्हार सेना‘ संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

या निवडीचे पत्र युवा प्रदेशाध्यक्ष सचिन सापनकर यांनी नुकतेच राहिंज यांना दिले. यावेळी श्रीगोंदा पंचायत समितीच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हॉलमध्ये कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा निवडीचा कार्यक्रम पार पडला. मीनाताई राहिंज यांच्या कार्याची दखल घेत, निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून मीनाताई यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य‘ प्रदेशाध्यक्ष सचिन सापनकर यांनी यावेळी उपस्थितांना संघटने संदर्भात माहिती दिली. यावेळी पत्रकार शकील भाई शेख, अनिल तुपे, प्रकाश निंबोरे, बापू कसबे, ज्ञानदेव शिरवाळे, आरोही शेख, राणी खरात, हीना शेख, नाना ससाने (पंचायत समिती सदस्य) यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मीनाताईंच्या निवडीबद्दल उपस्थितांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.

स्त्रोत:(पत्रकार अनिल तुपे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading