घरची परिस्थिती अतिशय गरिबीची डिप्लोमाचे शिक्षण कसेबसे पुर्ण केले. पुण्यात तीन हजाराची नोकरी लागली पण नोकरी सोडली आणि सन २००२ मध्ये पुणे कृषी महाविद्यालयात मशरूम उत्पादनाचे प्रशिक्षण घेतले लिंपणगावच्या माळरानावर तात्यासाहेब लखे यांनी एका छप्परात धिंगरी (ऑईस्टर) जातीचे मशरुम उत्पादन सुरू केले उत्पादन, ग्रेडींग, बियाणे उत्पादन व मार्केटींग बळावर तात्यासाहेब या व्यवसायात मास्टर झाले या व्यवसायातून लखे यांच्या कुंटूबात समृध्दीचा रंग भरला आहे.
तात्यासाहेब गहिणीनाथ लखे यांना वडिलोपार्जित अकरा एकर शेती तात्यासाहेब व पांडुरंग ही दोन मुले दोघांनी नोकरी करावी छप्परावरील गवत काढून दोन पत्र्याच्या खोल्या काढाव्यात अशी माफक अपेक्षा. सुदैवाने दोन्ही मुलांना नोकऱ्या लागल्या पण त्या नोकऱ्या क्षणीक ठरल्या जे मशरूम कोणी पाहिले नाही, कोणी खाल्ले नाही, कमी जागेत कमी पाण्यावर व कमी श्रमात करता येणारा मशरूम व्यवसायात करिअर करण्याचे धाडस या बंधूंनी केले.
सुरूवातीला गावातील लोकांनी नाव ठेवली पण तिच माणस तोंडात बोट घालून अबोल झाली. सुरूवातीला स्टेट बँक चे दोन लाखाचे कर्ज घेतले तयार झालेले मशरूम सायकल वरून फिरून विकण्यास सुरूवात केली दररोज ५०० रू. मिळायचे नंतर पुण्यात विक्री सुरू केली. तात्यासाहेब यांचा अनिताशी विवाह झाला ओम व शताषी ही दोन मुल झाली पांडुरंगचा विद्याशी विवाह झाला त्यांना मंगेश नावाचा मुलगा आहे. विवाह नंतर या दोन रणरागिनींनी खंबीर साथ दिली. मशरूम प्रकल्पाचे विस्तारीकरण केले आणि मशरूम बियाणांची प्रयोगशाळा सुरू केली हे बियाणे मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा राज्यात वितरीत केले जात आहे.
सध्या मशरुम प्रकल्पातून दरमहा पाच लाखाची उलाढाल होते. बँकेचे कर्ज हप्ते, मजूर व घरचा खर्च वजा जाता सुमारे एक लाखाचा नफा दहा गुंठे जागेवर मिळत आहे. पुण्यातील जैविक व चायनीज भाजीपाला पुरविण्यासाठी लखे यांनी गणेश मैंद यांना बरोबर घेऊन पुण्यात एक ॲग्री मॉल सुरू केला आहे. हा भाजीपाला तयार करण्यासाठी सव्वा एकर जागेत पॉलिहाऊस उभारले आहे. त्यामधून जैविक उत्पादने सुरू केली आहेत.
तात्यासाहेब लखे यांनी मशरूम च्या माध्यमातून पुणे मुंबईतील पंचतारांकित हॉटेल मॉल व ग्राहकांना नेमका कोणता भाजीपाला लागतो याचा अभ्यास केला स्व:ता फिरून पुण्यातील ग्राहकांना होम डिलिव्हरी दिली. ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांनी पुण्यात अंग्री मॉल सुरू केला. या मालमध्ये देश विदेशातील भाज्यांचा स्वाद निर्माण झाला आहे.
संदेश
मी बाजारपेठेत खूप फिरलो आहे. नवे नवे अनुभव अनुभवास मिळाले आहे. रासायनिक युक्त खते औषधांचा मारा केलेल्या भाजीपाला फळे खाण्यास ग्राहक तयार नाहीत. भाजी घेण्यापूर्वी तो लिटमस पेपरच्या साहाय्याने चाचण्या घेत आहे. त्यामुळे आपला भाजीपाला तसाच पडून राहतो. तरूण मुलांनी बायो जैविक औषधे खतांचा वापर करून उत्पादन घेतले तरच तरू शकतील. निश्चितच शेतीत चांगले पैसे मिळतील बाजारपेठेत वेगळी इमेज तयार होईल. तात्यासाहेब लखे लिंपनगांव.
स्त्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
नमूद माहिती पुस्तक प्रकाशनाच्या वेळेची आहे.
