महाराजा कॉलेजच्या मोहिनी जाधवला जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत २०० मीटरमध्ये तृतीय क्रमांक..

दिनांक १२ सप्टेंबर २०२५, श्रीगोंदा/राहता:

दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी सैनिक स्कूल लोणी तालुका राहता येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तर जलतरण स्विमिंग २०० मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाची खेळाडू मोहिनी जाधव हिने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवला.

तिला क्रीडा शिक्षक संजय डफळ व क्रीडा संचालिका कल्पना बागुल मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी खेळाडूं मोहिनीचे महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माजी आ. बबनराव पाचपुते, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य मा. बाबासाहेब भोस, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी आ. राहुल जगताप, मा. महावीर पाठवा,

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, डॉ.सुदाम भुजबळ, डॉ.नितीन थोरात, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे, जिमखाना प्रमुख प्रा.रमेश थोरात व प्रा. श्रीकांत थोरात, क्रीडा समिती अध्यक्ष सचिन जामदार, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading