आई म्हणजे सद्गुणांचे भांडार : प्रशांत चव्हाण.

दिनांक २ मार्च(वांगदरी,श्रीगोंदा):
आईमुळे जिवनात मातृत्व,दातृत्व व कर्तव्य सिद्ध करण्याची संधी मिळते.आई म्हणजे,सद्गुणांचे भांडार असते.असे मत भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष प्रशांत चव्हाण (सर )यांनी व्यक्त केले.
वांगदरी येथील दौपद्राबाई उबाळे यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त आयोजीत प्रबोधन सभेत ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वांगदरी गावचे उपसरपंच महेश नागवडे हे होते.ते पुढे म्हणाले त्यागी मातेच्या कार्यातुन कुटुंब घडते.त्यांच्या निधनानंतर पोकळी निर्माण होते.अशावेळी त्यांच्या शरीरावर प्रेम न करता विचाराव प्रेम करण्याचे आवहन केले.या वेळी माता रमाई ,भिमाई ,यशोधरा,यांचे जिवन पटावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बौद्धाचार्य सतिश ओहोळ (सर) यांनी केले. तर,आभार नितिन उबाळे यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading