“राज्यस्तरीय ओपन मार्शल आर्ट कराटे चॅम्पियनशिप २०२०” च्या विजेत्यांचा सन्मान सोहळा संपन्न..

दिनांक २ मार्च,श्रीगोंदा:
दक्ष नागरिक फाऊंडेशन ने श्रीगोंदा शहरातील कम्यु – निटी हॉल,पंतनगर येथे राज्यस्तरीय ओपन मार्शल आर्ट कराटे चॅम्पियन शिप २०२० चे आयोजन केले होते.
दररोजच कुठे ना कुठे लहान मुली व महिलांवर होणारे अत्याचार,यावर प्रतिबंध व्हावा,कराटे शिकुन स्वत:चे सरंक्षण करता यावे,महिला,पालक जागृत व्हावेत, लहान मुले-मुली कार्यक्रम पाहुन प्रोत्साहित व्हावेत,ही प्रथम संकल्पना दक्ष नागरिक फाऊंडेशनने मांडली.
या चॅम्पियन शिप मध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातुन सांगली,सातारा,कोल्हापुर,पुणे,अहमदनगर,बीड, औरंगाबाद येथुन खेळाडु मोठ्या संख्येने आले होते. या चॅम्पियन शिप मध्ये बांझ, सिल्व्हर व गोल्डन मेडल कष्ट पुर्वक खेळाडुंनी मिळविले. तृतीय क्रमांकाचे चषक कोल्हापुर जिल्ह्यातील शुभम सुतार, व्दितीय क्रमांकाचे अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी येथील विकास पवार, तर प्रथम क्रमांकाचे पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील अकबर शेख यांनी पटकाविले.यासाठी सर्वस्तरातुन विजेत्यांचे अभिनंदन होत आहे. चॅम्पियनशिपचे उदघाटन श्रीगोंदा पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव, मा.नगराध्यक्ष मनोहर पोटे, डॉ.विक्रम भोसले, बाळासाहेब पठारे, खर्डेकर काका, श्रीरंग साळवे, मोहन हारदे, भागचंद भालेराव आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दौलतराव जाधव म्हणाले,कराटे प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. कराटे शिकणारे किंवा पुर्णपणे प्रशिक्षित झालेले नागरिक यांनी स्वत:चे सरंक्षण केलेच पाहिजे.पण,कुणावर जर अत्याचार होत असेल.तर,पुढे होऊन विरोध केलाच पाहिजे.
मनोहर पोटे बोलताना म्हणाले की, दक्ष नागरिक फाऊंडेशनने चॅम्पियन शिप भरवुन श्रीगोंदा शहरावर एका अर्थाने उपकार केला आहे. नेहमीच असे उपक्रम होण्याची गरज असल्याचे म्हटले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रॅण्ड मास्टर समीर पांढरकर, मास्टर अनिल पठारे, दक्षचे अध्यक्ष दत्ताजी जगताप, मास्टर विकास पवार, मास्टर अजय खेतमाळीस, मास्टर सोमनाथ बोरुडे, मास्टर संदिप रोडे यांनी प्रयत्न केले. पंच म्हणुन ऋषिकेश घोडेकर, विजय सावंत, प्रमोद उबाळे, नरेंद्र बोरीकर, रणजित केसकर आदिंनी काम पाहिले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार दत्ताजी जगताप यांनी केले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading