चांदवड शेतकरी संघटनेने आयोजित केलेल्या कांदा परिषदेत, दिनांक १मार्च रोजी कांदा प्रश्नावर चर्चा करण्यात आली. कांद्या सहीत सर्व शेतीमालातील हस्तक्षेप बंद करुन शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे.या मागणीसाठी देशभरातील शेतकरी दिल्लीला धडक देणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी कांदा परिषदेत केली.
कांद्याच्या तुडवड्यामुळे कांद्याचे भाव वाढले होते. अनेक वर्षांनंतर शेतकऱ्यांना दोन पैसे मिळणार होते. पण,केंद्र शासनाने कांद्यावर घातलेल्या निर्बंधांमुळे व निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर घसरले.आता कांद्याची आवक वाढलेली आहे. दर कोसळत असताना सुद्धा कांद्यावरील निर्बंध हटविण्यास केंद्र शासन तयार नाही. या बाबत कांदा परिषदेतील वक्त्यांनी सडकुन टिका केली.
तामिळनाडू व आंध्रप्रदेशातील कांद्याच्या निर्यातीस केंद्राने परवानगी दिली.मात्र,माहाराष्ट्रातील कांद्याच्या निर्यातीला परवानगी नाकारुन राजकारणातील उट्टे काढण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा गळा कापला जात आहे. सरकार जर शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास तयार नसेल.तर,राज्या प्रामाणे देशातील शेतकरी विरोधी सरकार सुद्धा घरी पाठवण्याची तयारी शेतकऱ्यांनी करावी.असे आवाहन घनवट यांनी केले. कांदा प्रक्रिया उद्योगांना चालना द्यावी,नोंदणी सुलभ करावी, पुरेसा पत पुरवठा करण्यात यावा,तसेच देशातील व राज्यातील कांदा लागवड व उत्पादनाची माहिती शेतकरी, व्यापारी, निर्यातदार व उद्योजकांना दर पंधरवाड्याला देण्यात यावी.या बाबींचा कांदा परिषदेतील ठरावात समावेश केला आहे. शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी ही या परिषदेत करण्यात आली.
प्रमुख वक्ते,(सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष)विलास शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या तरूण मुलांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचा सल्ला दिला. या परिषदेत(कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष)भारत दिघोळे,(कांदा उत्पादक संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख) कुबेर जाधव,(प.महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा) सीमाताई नरोडे,(शेतकरी संघटना युवा आघाडी अध्यक्ष)सतीष दाणी या प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले.
कांद्या प्रमाणेच सर्व शेतीमालाचे भाव पाडण्याचे धोरण सत्तेत आलेल्या सर्व राजकीय पक्षांनी घेतले आहे. सर्व शेतीमाल निर्बंधमुक्त करुन शेतकऱ्यांना व्यापाराचे स्वातंत्र्य द्यावे.तसेच जगात उपलब्ध असलेले शेतीचे तंत्रज्ञान वापरण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळावे.यासाठी एप्रील महिण्यात देशभरातील शेतकऱ्यांना घेउन दिल्लीत आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा घनवट यांनी केली. शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या व किसान समन्वय समितीच्या बैठकीत आंदोलनाची तारीख ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कांदा परिषदेला अनेक जिल्ह्यातुन शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत(तालुका अध्यक्ष)अनंत सादडे यांनी केले.मान्यवरांचा सत्कार (संपर्क प्रमुख)त्रिंबक गांगुर्डे यांनी केले.परिषदेचे प्रास्ताविक(नाशिक जिल्हा अध्यक्ष)अर्जुनतात्या बोराडे यांनी केले.(शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष) देविदास पवार,(उ.महाराष्ट्र विभाग प्रमुख)संतू पाटील झांबरे,यांची भाषणे झाली.कांदा परिषदेचे सुत्र संचलन (स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष)शंकर पुकर यांनी केले.