दिनांक १४ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. अनुराधा राजेंद्र नागवडे यांची आज अहमदनगर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी निवड करणेत आली. सदर निवडीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी सौ. नागवडे यांना दिले. सदर प्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राज्य मार्केटींग महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा, अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष शरद नवले आदि मान्यवर उपस्थित होते.
सौ. अनुराधा नागवडे यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व महिला बालकल्याण समितीच्या सभापती म्हणुन अतिशय प्रभावीपणे काम केलेले आहे. दोन वर्षापुर्वी झालेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महिला प्रतिनिधी म्हणुन त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणुनही त्यांनी काम केलेले आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या १५ वर्षापासुन त्या सक्रिय असुन विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी मोठा जनाधार मिळविलेला आहे.
दिनांक ११ रोजी बालेवाडी क्रिडा संकुल पुणे येथे झालेल्या युवामिशन २०२४ या भव्य कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, तसेच राज्याचे मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पा., आदिती तटकरे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत सौ. अनुराधा नागवडे, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे, व्हा.चेअरमन बाबासाहेब भोस, युवानेते दिपकशेठ नागवडे, माजी सभापती सखाराम जगताप, मार्केट कमिटीचे माजी सभापती धनसिंग पा. भोयटे, सहकार महर्षी काष्टी सोसायटीचे चेअरमन राकेशभाऊ पाचपुते, आप्पासाहेब धायगुडे, ज्ञानदेव गवते, बंडुतात्या जगताप, असिफभाई इनामदार आदि मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
सौ. नागवडे यांची जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे नागवडे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साचे वातावरण तयार झाले असुन, जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, नागवडे कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासाहेब भोस, सर्व संचालक व विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी सौ. नागवडे यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
स्रोत:(प्रसिध्दी पत्र)
