दिनांक १० फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:
काल दिनांक ९ फेब्रुवारी रोजी रात्री ७:३० वाजता श्रीगोंदा शहरालगत औटी वाडी येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी सकल मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यासाठी राज्यभर आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी मंचकावर उपस्थित राहुन आपले विचार व्यक्त केले.
त्यांनी येथे उपस्थित समाज बांधवांना संबोधित करताना सांगितले की, अनेक शतकांनंतर एकत्र आलेल्या मराठा समाजाने असच एकत्र राहणं आवश्यक आहे. सर्वांनी शक्ती सोबत युक्तीला महत्व द्या.. गनिमी काव्याचे तंत्र आणि सामर्थ्य समाजात आहे. मराठ्यां समोरं एकही प्रश्न असा नाही.. की, तो सोडला जाऊ शकत नाही. मराठ्यांनी obc मधुनच आरक्षण घेतलय.. “माझी जात अनेक वर्षानी एक झालीय आता एकजूट तोडायची नाही”.. असे आवाहन समाज बांधवांना करत मनोज जरांगे यांनी आपले पुढील मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्रीगोंदा शहर, वाड्या, वस्त्या, तालुका परिसर आणि आसपास तालुक्यातील मराठा समाजाचे बहुसंख्य समाज बांधव आणि सकल मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सदरील सभा शांततापूर्ण मार्गाने संपन्न झाली.
स्रोत:(अधिकृत माहिती)
