नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूलची मनस्वी साखरे राज्यात दुसरी; विद्यार्थ्यांची मंथन परीक्षेत घवघवीत कामगिरी..

दिनांक २९ जुन २०२५,श्रीगोंदा:

मंथन वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या “मंथन जनरल नॉलेज एक्झामिनेशन २०२४-२५” मध्ये तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स इंग्लिश मिडीयम स्कूल, श्रीगोंदा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण राज्यात शाळेचा झेंडा उंचावला आहे.

या परीक्षेत इयत्ता पहिलीतील कु. मनस्वी मनोज साखरे हिने संपूर्ण राज्यात दुसरा क्रमांक पटकावत शाळेचा आणि श्रीगोंदा तालुक्याचा मान उंचावला.

परीक्षेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

🏅 राज्य आणि जिल्हा स्तरावरील विजेते विद्यार्थी

  1. कु. मनस्वी मनोज साखरे (इयत्ता – पहिली)
      राज्यस्तर – दुसरी
  2. कु. विराट अविनाश नागवडे (इयत्ता – पहिली)
      राज्यस्तर – सहावा, जिल्हास्तर – पहिला
  3. कु. अवंती अरुण पवार (इयत्ता – दुसरी)
      राज्यस्तर – सहावा, जिल्हास्तर – पहिला
  4. कु. प्रसन्ना सुर्यभान गोलांडे (इयत्ता – दुसरी)
      राज्यस्तर – आठवा, जिल्हास्तर – तिसरी
  5. कु. आराध्या संजय कसले (इयत्ता – दुसरी)
      राज्यस्तर – नववा, जिल्हास्तर – चौथी

🏆 केंद्रस्तरावरील यशस्वी विद्यार्थी

  1. कु. समर्थ शिवाजी नागवडे (इयत्ता – पहिली) – केंद्रात पहिला
  2. कु. राजवीर महेश साळुंखे (इयत्ता – पहिली) – केंद्रात दुसरा
  3. कु. शिवाज्ञा कपिल नागवडे (इयत्ता – तिसरी) – केंद्रात पहिली
  4. कु. अंशुमन अशोक गिरमकर (इयत्ता – तिसरी) – केंद्रात दुसरा
  5. कु. कनक कुंदन धालवडे (इयत्ता – तिसरी) – केंद्रात चौथी
  6. कु. तनिष्का ज्ञानेश्वर खेतमाळीस (इयत्ता – चौथी) – केंद्रात दुसरी
  7. कु. उत्कर्षा युवराज कुरुमकर (इयत्ता – चौथी) – केंद्रात तिसरी
  8. कु. सुस्मित सुजय व्यवहारे (इयत्ता – चौथी) – केंद्रात चौथा
  9. कु. श्रेयश मधुकर पांडुळे (इयत्ता – आठवी) – केंद्रात पहिला

शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी आणि ते लहान वयातच तयार व्हावेत या उद्देशाने प्री-प्रायमरीपासून मंथन, ओलंपियाड, अबॅकस, एन.एस.इ. अशा स्पर्धा परीक्षांचा नियमित सराव केला जातो, अशी माहिती शाळेचे निरीक्षक एस. पी. गोलांडे सर यांनी दिली.

या घवघवीत यशाबद्दल तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधा ताई नागवडे, निरीक्षक एस.पी. गोलांडे सर, मुख्याध्यापिका नीतू दुलानी मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

ही कामगिरी शाळेच्या दर्जेदार शिक्षणपद्धतीचा आणि विद्यार्थ्यांमध्ये घडवलेल्या स्पर्धात्मक मानसिकतेचा उत्तम नमुना आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading