नगर सोलापुर रोडवर अपघातात नवविवाहितेचा जागीच मृत्यू..

दिनांक १२ डिसेंबर(बनपिंप्री,श्रीगोंदा):

ट्रक व मोटारसायकलची टक्कर होऊन झालेल्या अपघातात लोणीव्यंकनाथ येथील चार मुले जागीच ठार झाल्याची घटना घडुन दोनच दिवस झाले असताना, श्रीगोंद्यात आणखी एक अपघात झाला आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

नगर – सोलापूर महामार्गावर दोन मोटारसायकलची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात अंकीता प्रशांत वाल्हेकर (वय २२, रा. थिटे सांगवी) ही नवविवाहिता जागीच ठार झाली.हि घटना बनपिंपरी शिवारात गुरुवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास झाली.प्रशांत वालेकर यांच्या मोटारसायकलला समोरच्या मोटार सायकलने चुकीच्या बाजूने येऊन धडक दिल्यामुळे या अपघातात प्रशांत वाल्हेकर हे जखमी झाले.

अंकिता व प्रशांत यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. ह्या घटनेमुळे थीटेसांगवी परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

स्रोत:(अधिराज्य न्यूज)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading