दिनांक १३ डिसेंबर,श्रीगोंदा:
तालुक्यातील नागवडे/जगताप/साजन शुगर देवदैठण हे तिनही कारखाने चालू होऊन दोन महिने झालेत. तिन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने चालू असून, लाखो टन गाळप आज रोजी केले आहे. नियमानुसार ऊस तोडणी नंतर पंधरा दिवसांत ऊसाचे FRP देणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही श्रीगोंदा तालुक्यातील व अ. नगर जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने यांनी अजूनही ऊसाचे पेमेंट दिलेले नाही.

नगर जिल्ह्यातील सर्वच सहकारी/खासगी कारखाने यांकडे करोडो रुपये थकले आहेत. जगताप(कुकडी) कारखाना व साईकृपा हिरडगाव यांची RRC ची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यावर पुढे जप्तीची कारवाई करण्यात आली नाही. यावर्षीच्या चालू गळीत हंगमापूर्वी जुने देणे व व्याज देणे गरजेचे होते. मात्र, ते सुद्धा अजून दिले गेले नाही.
कुकडी सहकारी(जगताप)कारखाण्याकडून मागील हंगामाची ५०० रुपये प्रति टन अशी अनेक शेतकऱ्यांची थकबाकी येणे आहे. शेतकरी मेटाकुटीला आले. तरी, माजी आमदार राहुल जगताप (चेअरमन) यांकडून करोडो रुपये येणे आहे. तसेच, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे पुत्र व कुटुंबिय यांच्या मालकीच्या साईकृपा हिरडगाव कारखाना यांकडून अजून ही शेतकऱ्यांचे व वाहतुकदारांचे थकीत पेमेंट येणे आहेत. या वर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. तरीही, या चालू गळीत हंगामातील बाकी अजून मिळाली नाही.
त्यामुळे दिनांक ११/१२/२० रोजी प्रादेशिक साखर सहसंचालक अहमदनगर यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. मागील वर्षी टिळक भोस व त्यांच्या सहकारी यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते व आमदार राहुल जगताप यांच्या निवासस्थानासमोर ९० दिवस ठिय्या आंदोलन केले होते. तसेच, अनेक दिवसांपासून थकीत पेमेंटसाठी सातत्याने पाठपुरावा देखील केला होता. तालुक्यातील प्रमुख नेते असलेल्या पाचपुते, जगताप, नागवडे कारखाने यांकडील थकीत पेमेंटमुळे तालुक्यातील शेतकरी मेटेकुटीला आला आहे.
यंदा अतिरिक्त ऊस उत्पादनमुळे शेतकरी उघडपणे बोलत नसला तरी, देखील कारखंदारांवर नाराज असल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम नागवडे – जगताप या साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीवर नक्की होऊ शकतो.
स्रोत:(टिळक भोस,संभाजी ब्रिगेड)
