कळा,उत्तम बंडू तुपे(भाग २७).

कळा,उत्तम बंडू तुपे..

” नग बोलूस ; पोटातलं व्हटांत आणून कायबी उपेग न्हाय . तुका ! मेलेल्याला आणखी मारू नगस . मी लोचीला या गावात आणतो . मंगलीला बघून लोचीच्या टक्कूरीत फरक पडल ; न्हाय पडल ती गोष्ट आणखी येगळी हाय ; पर लोचीनं मला लई सोबत केलीय . ती खिनभरासाठी बायकू हुती ; पर जल्माची सोबतीन . आईच्या हातानं ती करून घालत हुती . भनीचं काळीज तिच्या पोटात हाय .

https://bit.ly/bspmycityshrigonda

ह्या वक्ताला का तिला दुर्जन व्हयाचं ? लोची माझी ; ह्या दुर्व्याचीबी आय हाय . ‘ व्हय संतू; तुझं खरं हाय ; पर लोकांच्या तोंडाला कसा हात लावणार तू ? ” ” लोकांचं लोकापाशी . माझं माझ्यापाशी . लग्नाचा जोडा हाय माझ्या . तुका ! तू शहर करून आलाय . आरं , हाटिलांतलं खावून पोट भरतं ; पर समाधान हुतं ते घरातल्या अन्नानं . घरची सर बाहेर येणार न्हाय . हे तुलाबी कळतंय . माणसाला घर कशाला केलंय ? न्हायतर ती – बी गुराढोरागत जगली आसती . चार भिंतीच्या आत माणूस बंद करून घेतो ; तवा त्याचं त्यालाच सगळं उमगतं . “ संतू ! तू शेणा हाय .

आमी काय सांगावं ; पर लोचीला या वक्ताला आणनं खरं न्हाय . ती तिकडं मोकळी झाली की आणावी ; आसं मला वाटतंय . ‘ ” तुका ! त्याचं कोड तुला नगं . मी हाय ; सगळं माझ्या शिरावर घिनं . शेताआड चोरी दडतीय . ” “ पर ही आत्ता जगजाहीर हाय नव्हं . ‘ “ आसू दे . खुळ्यापनात घडलंय ; लोची चांगली हुती तवा ह्याच नारायण चव्हाणानं लई खटपटी केल्या . पैक्याआडक्याचं कपड्याधडूतांची भुरळ पाडायला बघिटलं ; पर या सगळ्यावर लोची मुतत हुती . ह्या खव्या वानांच्या तोंडाकडं तिनं बघिटलं नव्हतं ; पर त्यानं बी डाव साधून घिटलाय . ” ” संतू ! तूं तरी हे बोलू नगस . “ मी बोलणार – वरडणार नव्हं ; नारायण चव्हाणाच्या नावानं बोंब मारणार . सगळ्या दुनियेला सांगणार की , सत्या रोजगाऱ्याची खुळी झालेली बायकू नारायण चव्हाणानं धरली ; तुका ! हे मी बोलू नगं तर काय करू ? ”

“ त्यानं तुझा तोटा हुणार हाय . ” ‘ सगळ्या गावानं मला नुसतं राबवून घिटलं नको तिथं ; नको तसा माझा वापर करून घिटला . त्यात मला माझा फायदा कवा दिसला न्हाय ; तुका ! आमचा जलम यो आसा वापरून घेण्यासाठीच झालाय . गाव माणसानं भरत हुतं . काळ्या रातीत चांदण्या चमकाव्या तसी जत्रंला आलेली माणसं झगमगत हुती . लोकांची घरं पाहुणं – रावळ्यांनी गजबजून गेली ” हुती . माझं घर वाळीत टाकल्यागत दिसत हुतं . एक भन हुती . ती गेल्या जत्रेला आली हुती . ती ह्या जत्रेला येणार नव्हती . माझा वास , घाण दरवळ तिथवर गेला हुता . नाकातोंडाला धडपी लावून माणसं मला बघत हुती . एकादचा डुकरागत गावात रहात हुतो . कामापुरत कुणीबी जवळ करत हुतं .

जत्रा दोन रोज हाय म्हणताना मंगली गावात आली . नव्या कुत्र्याला बघून बाकीची कुत्री भुकावीत ; तसं गावात कालवा झाला . नारायण चव्हाणबी धावला . “ गतकाळे ! माझा भाऊ कुठं सोडला गं ; का कुठं गारद केला ? सांग की खजाळे. नारायण चव्हाण वाईटवकट बोलत हुता . तसं टकूऱ्यातला मेदू जळत हुता . उठून नरडीचा घोट घ्यावा वाटत हुतं . पर मंगलीनं मला बंदी घाटली हुती . सिरपत तुकाच्या घरात बसला हुता. त्याला तुकानं तिकडं बंद केलेला . मंगली दिसांत पडलेली. काय घ्या ; मारहाण केली तर ? वावटळ उठल्यागत झालं. सिरपत नारायण चव्हाणाच्या पुढं उभा राहिला .

” भाऊ ! काय बोलायचं ते मला बोला ; म्या तिला पळवून नेलीय .” “ आसं काय बघिटलं हुतं र सिरप्या , या गावभवानीच्यात ? ” “ जे तुमासनी दिसलं न्हाय ; ते म्या बघिटलं . ” ” सिरप्या घरी चल ; तिथं बोलू . ‘ ‘ ‘ मला ना घर ; ना दार . ” आरं ; हेच शिकला काय शाळंत जावून ; तुला शाळंत कशापाय घटला हुता आमी ? तुला बायकू पायजी हुती तर चित्रागत पोरी हुंड्यानं आल्या नसत्या ? ” मला त्या लागत नव्हत्या . “ मंग ही गावजाणी लागत हुती व्हयरं तुला ? रांडच्या येतू का न्हाय ? ” ‘ भाऊ ! तुमी तुमची पायरी सोडली तर मलाबी सोडावी लागंल . “

“ आरं , मंग सोड . सोड पायरी . ‘ भाऊ – भाऊ तंडत हुतं . जत्रा बघायला आलेली सगळीच यो तमाशा बघत उभी राहिलेली . मला उगंच बरबडून काढल्यागत वाटायला लागलं . जावून नारायण चव्हाणाचं नरडं दाबावं वाटायला लागलं . मोठ्यानं आरडलो , “ नाऱ्या आत्ता शेणा हूं ; हिथनं सूट मयला . बघू ! ” ‘ माकडा ! मला दबावण्या घालू नगस . पोरीला भरीला घालून आमची भावा – भावाची कलागते लावलीस . संत्या ! तुला जिता ठिवायच् न्हाय . नाऱ्या ! तो संत्या मरून लइ दिस झालं . ह्यो तुझा बा हाय मी . ” आसा धावलो .

https://bit.ly/bspmycityshrigonda

8तवर तुकानं आन् मव्हण्यानं मिठी मारली . मागं रेटलं ; रेटतच नेहूण घरात ” “” घाटलं . तुकानं आतनं कडी घाटली . “ संतू ! तुलाबी खूळ लागलाय . आरं , गुळानं मरतयं त्याला इक दियाला लागत का ? तू उगा बस . ” तुका , म्हव्हण्या त्यांच्या परीनं समजावत हुतं . खरं माझं टकर भडकलं हुतं . ज्याच्यामुळं माझ्या सगळ्या परपंच्याचा खेळखंडोबा झाला ; त्यो नारायण चव्हाण माझ्याच छाताडावर चढून येतोय मजी काय ? आमी गरीब – दुबळं हाय ; त्याचा फायदा आजपावतर घिटला ते मोप झालं . आमीबी लई सोसलं. आत्ता न्हाय सोसवत मला . बाहेर नुसता कालवा चालला हुता. आग लागल्यागत माणसं आरडत हुती . जळत्या घरात बसल्यागत वाटत हुतं. तरी पुढ्यात तुका – मव्हन निर्विकार बसलं हुतं..

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading