साईकृपा युनिट हिरडगांव चा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ साध्या पद्धतीने संपन्न…

श्रीगोंदा दिनांक २९ ऑक्टोबर:

श्रीगोंद्यासह  इतर भागात शेतक-याकडील असलेल्या ऊसाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने साखर कारखाना सुरु होणे अत्यंत महत्वाचे होते.त्या  अनुषंगाने गेल्या वर्ष भरापासून कोणीतीही चर्चा न करता अडचणीतून मार्ग काढत शेतक-यांची थकीत ऊस बिले अदा करून कारखाना सुरु करणेची कार्यवाही सुरु होती. विरोधकांनी आम्हां पाचपुते कुटुंबियांवर वेळोवेळी थकीत ऊस बिलाचे राजकारण करून कारखाना अडचणीत आण्याचे काम केले या हि परिस्थिती हिरडगांव कारखाना ऊस उत्पादक शेतक-यासाठी  सुरु होणे अत्यंत गरजेचे होते. सर्वांच्या सहकार्याने कारखान्यांचे चेअरमन विक्रमसिंह पाचपुते व सर्व संचालक मंडळांनी कारखाना चालू करण्याचा जो निर्णय घेतला तो कौतुकास्पद असल्याचे गौरवउद्गगार कारखान्यांचे संस्थापक माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी   बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ वेळी काढले.

या सर्व अडचणीतून मार्ग काढत  साईकृपा युनिट हिरडगांव चा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ आज कारखान्यांचे चेअरमन विक्रमसिंह पाचपुते व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.सौ.पल्लवी  पाचपुते यांचे हस्ते साध्या पद्धतीने संपन्न झाला.यावेळी कारखान्यांचे कार्यकारी संचालक राजकुमार ढमढेरे, संचालक अँड.शिवाजीराव अनभुले, संचालक अँड.प्रतापसिंह पाचपुते, अँड.सौ.रुपालीताई  शिरगांवकर पाटील,  तसेच चिफ इंजि.गिरमे सो,  चिफ केमिस्ट रविचंद्रन सो,  को-जन मँनेजर  स्वामी सो, ईलेक्ट्रिक  मँनेजर रणशूर सो, डिस्टलरी मँनेजर  शिंदे सो, शेतकी अधिकारी जाधव सो, डेप्युटी  डिस्टलरी मँनेजर ओहळ सो,  फायनान्स मँनेजर चव्हाण सो,  डेप्युटी केन  मँनेजर धालवडे सो,  एच आर मँनेजर पवार सो, इ .अधिकारी वर्ग व सर्व  कर्मचारी वृंद हजर होते.

बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभा वेळी कारखान्यांचे चेअरमन विक्रमसिंह पाचपुते म्हणाले कि  ऊस उत्पादक शेतक-यांनी येथून पुढे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, तसेच यापूर्वी अडचणीच्या काळात सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी व अधिकारी, कर्मचारी नि आम्हांस वेळोवेळी लाख मोलाचे सहकार्य केलेलंच आहे. कारखान्यांच्या कामगारांना महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या पगार वाढीच्या शिफारशी मान्य करून  वेज बोर्ड सटेंबर २०१८ पासून  लागू करण्याची घोषणा  विक्रमसिंह पाचपुते यांनी यावेळी केली . तसेच आत्ता हि असेच सर्वांनीच सहकार्य करून ऊसाबाबत शेतक-यांच्या काही अडचणी असल्यास शेतक-यांनी कारखाना प्रशासनाशी  संपर्क करून गाळप हंगाम यशस्वी करणेस मदत करावी असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading