राष्ट्रीय बालस्वास्थ योजना सर्वसामान्यांची जीवनदायिनी…

श्रीगोंदा दिनांक २९ ऑक्टोबर :   राष्ट्रीय बाल स्वास्थ योजने अंतर्गत तालुक्यातील शाळांची वर्ष्यातुन एकदा व अंगणवाडीची वर्षातुन दोनदा मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येते.अशी सुमारे ९२ हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती, डॉ.नवीन यादव यांनी दिली .यामध्ये गत ५ वर्ष्यात ४५ ह्रदय शस्त्रक्रिया सुमारे १६० पर्यंत वाचादोष व इतर शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या.आर.बी.एस.के. पथकामध्ये ८ पैकी ४ डॉक्टर कार्यरत असताना ही कामगिरी कौतुक करण्यासारखी आहे.तपासणी मध्ये गंभीर आजारी विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालय व सिव्हिल हॉस्पिटल येथे विविध शिबिरामध्ये संदर्भ सेवा देण्यात येते.आद्यपर्यंत हृदयदोष, वाचादोष ,अपेनडिक्स, हार्निया व इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.गोरगरीब विद्यार्थ्यांनी खाजगी उपचार न करता ,शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा ,असे आव्हान डॉ .यादव यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading