बेकायदा अतिक्रमण काढण्यासाठी, श्रीगोंदा नगरपालिके समोर विधवा महिलेचे आमरण उपोषण ….

श्रीगोंदा दिनांक २६ ऑक्टोबर:  श्रीगोंदा शहरातील पंचायत समिती रोडवर गोडावन जवळील इंदिरानगर येथे , वास्थव्यास असणाऱ्या रंजना भगवान गालिंदे, यांच्या राहत्या घराच्या समोर रस्त्याच्या बाजूने काही लोकांनी आनाधिकार शाहीने अतिक्रमणे लावून, त्यांची दुकानदारी चालू केलेली आहे.यामुळे गालिंदे यांनी हे बेकायदा अतिक्रमण काढावेत म्हणून नगरपालिका प्रशासनांस लेखी सूचित करीत, दिनांक २५ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण चालू केले आहे.                                                                                       सविस्तर वृत्त असे की, रंजना भगवान गालिंदे या विधवा महिला असून, त्या त्यांच्या दोन मुली व मुला सह या ठिकाणी वास्तव्यास आहेत.सन १९७६ साली श्रीगोंदा येथील इंदिरानगर मध्ये भूमिहीन मजुरांसाठी उपलब्ध जमिनीतून गट क्रमांक ९३१ मध्ये प्लॉट १ मध्ये १०० चौ.मी.इतकी जागा त्यांना मिळाली होती.ही जागा पंचायत समिती रोडच्या लगत असून. नगरपालिकेचा बांधकाम परवाना घेऊन याठिकाणी गालिंदे यांनी पत्र्याचे बांधकाम केले आहे.मात्र रस्त्यालगत बाळासाहेब जगताप , दादा क्षीरसागर, शरीफभाई कुरेशी यांनी बेकायदा बांधकामे करून व्यवसाय चालू केले असल्याचे गालिंदे यांनी निवेदनात नमूद केले असून, त्यांची अतिक्रमणे हटवण्यात येऊन,सदरील जागा मोकळी करण्यात यावी. या विषयी अर्ज श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनाला गालिंदे यांनी दिला आहे.त्यात त्यांनी नगरपालिकेला या अतिक्रमना विषयी वारंवार कळविले असून, नगरपालिकेने या अतिक्रमण धारकांवर कोणतीही कारवाई केलेली नाही.                                                                                         यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करून,संबंधित ठिकाणी झालेल्या अतिक्रमना संदर्भात पाठपुरावा केला असल्याचे आंदोलन कर्त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.शिवाय जिल्हाधिकारी कार्यलयामार्फत उपोषणा दरम्यान दिलेले लेखी आश्वासन, ज्यात नगरपालिकेला अतिक्रमण हटवण्या संदर्भात काही सूचना देण्यात आल्या होत्या, त्याकडे ही पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचे गालिंदे यांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे. या विषयी पालिका गंभीरतेने दखल घेत नसल्याने दिनांक २५ ऑक्टोबर पासून रंजना गालिंदे यांनी श्रीगोंदा नगरपालिकेच्या समोरच आमरण उपोषण सुरू केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading