• पेडगावात संविधान जागर अभियानाचे “भारत माझा मी भारताचा” अभियान…

• विद्यार्थी वर्गाला प्रतिज्ञेचा खरा व योग्य अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न….

पेडगाव ,श्रीगोंदा,दिनांक ९ नोव्हेंबर :-आपण प्रत्येकजण  शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणत आलो आहोत. आजही प्रत्येक शाळेत ही प्रतिज्ञा म्हटली जाते. परंपरेनुसार हे काम शाळा पार पाडतात. पण या प्रतिज्ञेचा अर्थ नेमकेपणाने समजून सांगितला जातोच असे नाही. समाजात वाढत चाललेली असहिष्णुता व वाढलेला हिंसाचार बघता आपण या प्रतिज्ञेनुसार वागत नाही. मोठी माणसेच अशी वागत नसल्यामुळे लहान मुलांवरही कळत नकळत असे संस्कार होत असतात. यामुळे भावी नागरिक म्हणून घडणाऱ्या विद्यार्थ्यांची मने एका अर्थाने प्रदूषित होतात. हे विचारांचे प्रदूषण थांबवले पाहिजे,याकरता सर्व शालेय व महाविद्यालयीन ययुवा वर्गाला प्रतिज्ञेचा खरा व योग्य अर्थ समजावून सांगणे हा “भारत माझा मी भारताचा” अभियानाचे ध्येय आहे

ही प्रतिज्ञा 1962 साली. आंध्रप्रदेश चे सुप्रसिद्ध साहित्यिक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी तेलगू भाषेत लिहिली. मग तिचे सर्व भाषांत भाषांतर करण्यात आले. भारताच्या विविधतेने नटलेल्या संमिश्र संस्कृतीचा अत्यंत प्रभावीपणे  व कमी शब्दात आशय व्यक्त करणारी प्रतिज्ञा वेगवेगळी उदाहरणे देऊन समजावून सांगितली जाते,त्याच प्रमाणे समाजात कसे वागले पाहिजे यावर भाष्य करते. 

श्रीगोंदा तालुक्यात या अभियानाची सुरुवात 8 नोव्हेंबर दिवाळीच्या निमित्ताने पेडगाव येथील तथागत नगर मध्ये करण्यात आली. तथागत नगर मधील विद्यार्थ्यांना  प्रतिज्ञेचा हा अर्थ समजावून सांगण्याचे काम  अखिल भारतीय राष्ट्रसेवा ब्रिगेड(ABRB) चे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते नितीन घोडके यांनी केले. विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प केला.तसेच प्रतिज्ञेच्या अशयाप्रमाणे वागण्याची शपथ घेतली.या कार्यक्रमासाठीअखिल भारतीय राष्ट्रसेवा ब्रिगेड व आयकॉन्स फौंडेशन चे कार्यकर्ते  ग्रा. सदस्य प्रकाश घोडके,कोमल म्हस्के,तृप्ती म्हस्के,वर्षा उजागरे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply