समाजामध्ये बंधुभाव व एकजुट निर्माण करण्यासाठी संविधानिक मार्गने लढाई ….
अहमदनगर दिनांक ५ नोव्हेंबर – बहुजन क्रांती मोर्चा समाजामध्ये बंधुभाव व एकजुट निर्माण करुन त्यांचे संविधानिक मुलभूत अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी शांततापुर्ण आणि संविधानिक मार्गने लढाई लढण्याचे काम करीत आहे वर्तमान भाजपा सरकार हे लोकशाही आणि संविधान यांच्या विरोधी सरकार आहे. त्यामुळेच सरकार विरोधात उठणारा प्रत्येक आवाज दाबुन टाकण्याचे काम हे सरकार करीत आहे.
लोकशाहीमधे जनतेला मान्य नसणाऱ्या गोष्टींना विरोध करण्याचा, असहमती दर्शविण्याचा आणि त्यासाठी आपले मत अभिव्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने अनुच्छेद १९ व्दारा दिला आहे. परंतु हे सरकार संविधानाच्या विरोधात जावुन जनतेचा आवाज जबरदस्तीने दाबण्याचे काम करीत आहे. असे उद्गार बहुजन क्रांती मोर्चा प्रसंगी राजेंद्र करंदिकर यांनी काढले.
यावेळी राजेंद्र करंदीकर(जिल्हा संयोजक, बहुजन क्रांती मोर्चा), डॉ. मगनराव ससाणे(राष्ट्रीय अध्यक्ष, इम्पा), संतोषराव रोहम(जिलहा अध्यक्ष, बहुजन मुक्ती पार्टी अ.नगर), दिपकराव काळे(भारत मुक्ती),अविनाश देशमुख(जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी अ.नगर द.), संजय संसारे,डॉ. रमेश गायकवाड,मनोहर वाघ, (राज्य उपाध्यख, भारतीय विद्यार्थी मोर्चा), राजाभाऊ दिवेकर, शामराव काते, डॉ. भास्कर रणनवेर, गणपत मोरे, संजय वाघमारे, सुजाता पातारे(महिला आघाडी प्रमुख), अजित झोडगे, किरण सोनवणे, सुरेश गायकवाड, अतुल भालेराव, विजय पवार, संदीप विधाटे, दत्ता गायकवाड, सागर भिंगारदिवे, नामदेव घोडके हे हजर होते. तेव्हा आम्ही लोकशाहीचे, संविधानाचे आणि आमच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी संविधानाच्या अधीन राहुन जेलभरो आंदोलन करणार संविधानाचा अनुच्छेद -१९ चे समर्थन करण्यासाठी, ई.व्ही.एम. मशिनला विरोध करण्यासाठी, अनुसुचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांवर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराचा विरोध करण्यासाठी, भटके-विमुक्त, ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्याक समुदायांवर होणऱ्या अन्याय अत्याचाराचा विरोध करण्यासाठी, खाजगीकरण लागु करुन संविधानाच्या आरक्षण धोरणाला संपविण्याचा षडयंत्राला विरोध करण्यासाठी असे म्हणत सर्वांनी स्वतः अटक करुन घेतले. पोलिसांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे नेहुन आंदोलकांची सुटका करण्यात आली.

