शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन श्रीगोंदा आयोजित भव्य दिवाळी किल्ले बनवा स्पर्धा…

कोळगाव,श्रीगोंदा, दिनांक ४ नोव्हेंबर :

ट्रेकर्स फाउंडेशन श्रीगोंदा या ट्रेकर्स ग्रुपचे वतीने श्रीगोंदा तालुक्यात भव्य दिवाळी गडकिल्ले बनवा स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेत विद्यार्थी, व बाल ट्रेकर्स ने सहभाग नोंदवावा व प्रमाणपत्रासह बक्षिसे जिंकवीत अशी माहिती फाउंडेशन चे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी दिली.                                                                           दिवाळी म्हटलं की  बच्चे कंपनीसाठी औत्सुक्याचा आणि आवडीचा विषय म्हणजे किल्ले बनविणे. एरवी पुस्तकात शिवरायांचा अचंबित करणारा पराक्रम डोळ्यासमोर घेऊन येणारे गड-किल्ले, त्यांची हुबेहूब प्रतिकृती प्रत्यक्षात हाताने साकारण्याची मजा काही औरच. भले त्यासाठी चिखलात माखायला का लागेना..  दगड-विटांवर मनसोक्त चिखलफेक करून त्यातून हुबेहूब गड, किल्ला बनवायचा. फिरत्या चाकावर मातीला आकार देणा-या कलाकारालाही मागे सारेल, असे किल्ले बनविण्याचे कसब या मुलांना ख-या अर्थाने शिकायला मिळते ते दिवाळीतच….       किल्ले बनविणे ही आपल्या महाराष्ट्राची परंपराच आहे.                                                                                                                            आपल्या महाराष्ट्रात किल्ल्यांना एक आगळेवेगळे स्थान आहे. हे ऐतिहासिक किल्ले त्या काळातील राजे-महाराजांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देतात.इतिहासकालीन पराक्रम आणि संघर्षाचे हे गड-किल्ले प्रतीक आहेत. लहान मुले इतिहासाच्या पुस्तकात असणारे किल्ले दिवाळीच्या सुट्टीत जशाच तशा स्वरूपात माती, दगड व विटांनी बनवत असतात. त्यांची हुबेहूब किल्ले बनविण्याची कला मोठय़ांना चकित व अचंबित करणारी असते. शिवाजी महाराजांचा इतिहास आज जरी बरीचशी तरुण पिढी विसरत चालली असली. तरी, आजची बच्चे कंपनी मात्र महाराष्ट्राचा मराठमोळय़ा इतिहास संस्कृतीची आठवण दिवाळीत किल्ल्यांच्या स्वरूपात ताजी करीत आहेत.पाश्चात्त्य मराठी संस्कृतीचे अनुकरण करणा-या तरुण पिढीला मागे पाडीत, आजची बच्चे कंपनी आपली परंपरा, संस्कृती व आपला इतिहास दिवाळीच्या निमित्ताने सर्वाना आठवण करून देत आहे. किल्ला बनविण्यासाठी लहान मुलं दगड, माती, विटा, पाणी, लाकडे मिळवण्यासाठी दुपारी उन्हातान्हात फिरत असतात. काही बदल हे निश्चितच झाले असून,बदलत्या काळाबरोबरच आधुनिकतेची सांगड पाहावयास ग्रामीण भागात मिळत आहे. एरवी मोबाईलच्या ऑनलाईन विश्वात दंग असणारी मुले किल्ले बनविण्याच्या निमित्ताने का होईना मातीत हात घालतात.  त्याचप्रमाणे किल्ल्यांची माहिती व्यवस्थित मिळवण्यासाठी किल्ल्यावर प्रत्यक्ष भेट देण्याबरोबरीनेच, विविध माध्यमातून मिळणा-या चित्रांच्या साहाय्याने किल्ला अधिक रेखीव व्हावा यासाठी लहान मुलांकडून प्रयत्न होत असतात. लहान मुलांना किल्ले बनविण्याची आपली संस्कृती, इतिहास जपण्यात उत्तेजन, स्फूर्ती देण्यात मोठय़ांनी व कुटुंबीयांनी पुढाकार घ्यायला हवा.                                                                                                   महाराष्ट्राच्या गतवैभवाची साक्ष देणारे किल्ले दुर्लक्षामुळे ढासळू लागले असताना, या किल्ल्यांच्या इतिहासाची उजळणी विद्यार्थ्यांमध्ये व्हावी, या उद्देशाने सुरू झालेला ‘दिवाळीतील किल्ले’ बनवण्याचा उपक्रम अपु-या जागांमुळे कमी होऊ लागला आहे.                                                                                                                               परिसरात किल्ले बनवण्यामध्ये रमलेले विद्यार्थी दिसतात. त्यातही रेडीमेड अथवा काल्पनिक किल्ल्यांपेक्षा प्रत्यक्ष किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याकडे त्यांचा कल वाढू लागला आहे. तरुणांनी वेळात वेळ काढून या लहान मावळ्यांना मदत करावी.किल्ले बनवण्याचा उद्देश केवळ मनोरंजन किंवा खेळ नसून, त्यामुळे आपल्यातील प्रयोगशीलतेला आणि कल्पकतेला वाव मिळतो. त्या माध्यमातून अनेक नवनवीन क्लृप्त्या आपल्या डोक्यात येत असतात.किल्ल्याची ओळख , मुलांना ऐतिहासिक किल्ल्यांचे महत्त्व कळावे आणि हे ऐतिहासिक किल्ले बनविण्यासाठी आपल्या पूर्वजांनी घेतलेल्या श्रमाचे महत्त्व कळावे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. शाळेच्या सुट्टीत मुलांकडून किल्ले बनवून घेण्यात यावेत, तरच किल्ल्यांचा इतिहास मुलांना कळेल. मुलेही मजेत व आवडीने किल्ले बनवितात. मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यास त्या मुलांना आनंद मिळेल.अशी पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा आमचा शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन चा छोटासा  प्रयत्न आहे.                                                                                                    त्यासाठी  सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळेल . यावेळी शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन चे प्रमोद शिर्के, साई कुमार शिंदे, संदिप हिरवे, जालिंदर पाडळे, बाळकृष्ण भापकर, योगेश चंदन, कपिलेश्वर उल्हारे, मारुती वागस्कर, सौ.संगीता इंगळे, सौ.गीता वेठेकर, सौ.जयश्री शिंदे, सौ.अश्विनी भापकर उपस्थित होते.

(छायाचित्र व वार्तांकन :योगेश चंदन)

enews@बहुजन समता पत्र – वृत्तसेवा

RNI NO.MAHMAR 2013/52567.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading