स्वानुभवातून जीवन शिक्षणाकडे , कळसकरवाडी शालेचा बाल चमुंचा आनंदी बाजार , उपक्रमांचा लळा कळसकरवाडी शाळा …..
कळसकरवाडी,श्रीगोंदा, दिनांक ४ नोव्हेंबर :आज जि.प.प्रा.शाळा कळसकरवाडी शाळेत कार्यानुभव अंतर्गत आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उदघाटन पोलीस पाटील भुजंगराव कळसकर ,आणि माजी उपसरपंच लक्ष्मण नाना कळसकर यांचे हस्ते करण्यात आले यावेळी घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. सुभाषराव कळसकर,उपसरपंच कमलताई नलगे, दिलीपनाना कळसकर,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष गोरख इथापे, माजी अध्यक्ष संजुभाऊ कळसकर,संभाजीराजे नलगे आवर्जून उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी तयार केलेले आकाश कंदील मुलांनी विक्री साठी ठेवले होते, तसेच सर्व मुलांनी सहभाग घेतला पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला सकाळी १० वा सुरू झालेल्या बाजारात मोठी उलाढाल झाली. त्यापेक्षा मुलांचा आनंद अगणित अवर्णनीय ओसंडून वाहत होता. व्यवहारज्ञान मुलांनी अनुभवले. भाजीपाल्यापासून ते अंड्यांपर्यंत सगळ्या गोष्टींचा समावेश बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होता. मुलांचा सर्व माल संपला. मुलांच्या या बाजारपेठेत सुमारे ३४७३ रु उलाढाल झाली. अचानक ठरवलेल्या उपक्रमास कळसकर वाडीच्या पालकांचे व ग्रामस्थांनचे १००% पाठबळ आणि सक्रिय सहभाग मिळाल्याने हा उपक्रम यशस्वी झाला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपक्रमशील शिक्षिका ठाणगे मॅडम ,मुख्याध्यापक श्री. नवनाथ काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
(छायाचित्र व वार्तांकन :योगेश चंदन)
