तातडीने शहरातील रस्त्यावरील धूळ कमी न केल्यास !श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये धूळफेक आंदोलन करनार :संभाजी ब्रिगेड ….

श्रीगोंदा दिनांक २ नोव्हेंबर :

श्रीगोंदा शहरातील प्रमुख रस्ता जामखेड श्रीगोंदा काष्टी रोड या रोडचे मागील अनेक दिवसांपासून काम चालू आहे. श्रीगोंदा नगरपालिकेने योजनेअंतर्गत तेहतीस कोटी ची कामे सध्या शहरांमध्ये चालू आहेत. या योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम चालू आहे. मात्र, काम चालू होऊन दीड वर्षांचा कालावधी होत आला तरीही, या प्रमुख रस्त्याचे काम अजून पूर्ण झालेले नाही. तसेच, या रस्त्यावरील दुभाजक व फ्लाईट काढलेले सध्या या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर धूळ पसरलेली आहे. हा रस्ता शहरातील सर्वात जास्त वर्दळीचा रस्ता असल्याने तसेच एस. टी. वाहतूक जामखेड काष्टी रोडवरील वाहतूक बाजार पेठ प्रमुख दोन कॉलेज असल्याने, या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. त्यामुळे, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धुळ पसरलेली आहे. जर एकादे चारचाकी वाहन गेले तर, धुळीचे लोट वातावरणात पसरतात. त्यामुळे, या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक लोकांना श्वसनाचा त्रास होत आहे.रस्त्यावर व रस्त्यालगत व्यवसाय करणारे फेरीवाले, वडापाव दुकान दार, स्टेशनरी कृषी दुकान व टपरीधारक तसेच हॉटेल व व्यापारी अशा सर्वच वर्गाला मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. मात्र निवडणुकीच्या रंगांमध्ये दंग झालेले या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. या भागातील लोकांचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत.                                                  त्यामुळे संभाजी ब्रिगेड च्या वतीने श्रीगोंदा शहरातील या नागरिकांना मोफत मास्क वाटप करण्यात आले. धुळी मुळे होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती करून जनतेला मास्क चे महत्त्व सांगण्यात आले.श्रीगोंदा शहरात संभाजी ब्रिगेडच्या या उपक्रमाची जोरदार चर्चा चालू असून, श्रीगोंदा न.पा. चे मुख्याधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. दिवाळीपूर्वी हा प्रमुख रस्ता पूर्ण करा. अथवा या रस्त्यावरील धुळे कमी करा.नाहीतर संभाजी ब्रिगेड च्या वतीने रस्त्यावरील धूळ जमा करून श्रीगोंदा नपाच्या कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी व पदाधिकारी यांच्या दालनामध्ये ही धूळ आणून टाकले जाईल. असे पत्र संभाजी ब्रिगेडने दिले आहे .                                    यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष दिलीप लबडे म्हणाले की , निवडणुकीमध्ये दंग असलेले नगरसेवक व नगराध्यक्ष यांना जनतेच्या आरोग्याची काळजी नसून फक्त वाढदिवस साजरे करणे, एवढेच काम शिल्लक आहे. मागील अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही, रस्त्याची कामे गोगलगाईच्या वेगाने चालू आहेत. त्यामुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तरी,तातडीने या रस्त्यावरील धूळ कमी न केल्यास, श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये धूळफेक आंदोलन करण्यात येईल. असे त्यांनी सांगितले तसेच श्रीगोंदा शहरातील इतरही रस्ते तातडीने पूर्ण करा अन्यथा संभाजी ब्रिगेडला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी दिली. श्रीगोंदा नगरपालिकेतील कर्मचारी अधिकारी, पदाधिकारी हे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. त्यामुळे अशा लोकांना येत्या निवडणुकीत जनतेने धूळ चारावी अशी मागणी, संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.                                        यावेळी (जिल्हा उपाध्यक्ष) दिलीप वाळुंज, (तालुका उपाध्यक्ष) युवराज पळसकर,(सचिव) सुहास गाडेकर,( तालुकाध्यक्ष) युवराज चिखलठाने (संघटक) बापू मांडे,( उपाध्यक्ष) गोरख घोडके, शाहरुख शेख, प्रदिप ढवळे, गोरख कडूस इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading