अनुसूचित जाती जमातीच्या संविधानिक हक्कांसाठी बहुजन समाज पार्टीची आंदोलनांची घोषणा …

श्रीगोंदा दिनांक २ नोव्हेंबर :- श्रीगोंदा पंचायत समितीच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती साठी देण्यात येणाऱ्या घरकुल  लाभ धारकांना त्यांच्या संविधानिक लाभापासून वंचित ठेवले जात असल्याने, त्यांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी सुनील ओहोळ व बहुजन समाज पार्टी च्या माध्यमातून श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोल करणार असल्याचे ओहोळ यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

                                    दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की,श्रीगोंदा पंचायत समिती मधून देण्यात येणाऱ्या घरकुलांच्या बाबतीत अनुसूचित जाती जमाती समाजातील लाभ धारक त्यांच्या संविधानिक लाभापासून वंचित राहत आहेत.अनेकांना स्वतःची घरे नाहीत , जागा नाही.काही लाभार्थ्यांना गोठा ,कोपी, भाड्यांच्या घराचा आसरा घ्यावा लागत आहे.अनेक आदिवासी बांधव हे सरकारी जागेत अतिक्रमण कारून राहतात.म्हणून खरे लाभार्थी हे या शासनाच्या योजनां पासून वंचित राहातात. अनुसूचित जाती जमाती चे लोक ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्या जागा शासनाने त्यांच्या नावावर करून देणे गरजेचे असल्याचे सुनील ओहोळ यांनीं नीवेदनात नमुद केले आहे .स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही हा समाज पूर्वी होता त्याच प्रकारे जीवन व्यतित करित आहे. अनेकांना जागा आहेत. मात्र, कमी क्षेत्र असल्याने त्यांचे प्रस्थाव स्वीकारले जात नाहीत.विशेष करून हा कष्टकरी या देशाचा मूळ रहिवासी असलेल्या समाजाच्या या अवस्थेला या देशातील सत्ताधारी व प्रशासनातील अधिकारी जबाबदार असून,त्यांनी अपल्या घटनेने दिलेल्या कर्तव्यांची जाणीव ठेवून ,या सर्व समाजाला राहत असतील त्या जागेवरती घरकुले द्यावीत.अशी मागणी या निवेदनात ओहोळ यांनी यांनी केली आहे.तशेच, ग्रामपंचायतींना सूचना देऊन सर्व अतिक्रमणे नियमित करून त्यांना खाते उतारा देण्यात यावा व सर्व येणारे प्रस्ताव स्वीकारावेत अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.तशेच शबरी योजनेत केवळ श्रीगोंदा तालुक्यात ९२ घरकुले असून,त्यामध्ये केवळ २५ ते ३० लाभार्थी पात्र ठरले असून उर्वरीत अपात्र ठरले आहेत.तरी शबरी घरकुलांची संख्या वाढविण्यात यावी व पारधी आवास योजना अद्याप चालू नसून ,ती तात्काळ चालू करून, लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट करण्या विषयी बहुजन समाज पक्ष्याच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.                                                                                                सरकार व प्रशासनाची अनुसूचित जाती जमाती समाजाच्या बाबतीत असलेली उदासीनता व बेजबाबदार नीतीच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती यांच्या संविधानिक हक्का साठी, बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल.असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.१२नोव्हेंबर रोजी बसपा च्या वतीने तहसिल कार्यालय श्रीगोंदा यांच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करनार असल्याचे निवेदनात म्हटले आहे .                                                                                                               या आंदोलनात (विधानसभा अध्यक्ष) विठ्ठल म्हस्के ,(महासचिव) दत्तात्रय गोरखे ,(विधानसभा प्रभारी) स्वप्नील पवार ,(व्ही.व्ही.एफ) संदीप चव्हाण ,(विधानसभा प्रभारी) सालीम अत्तार .हेही उपस्थित राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading