श्रीगोंद्यात रेशनकार्ड अर्ज प्रक्रियेत अडथळे; नागरिकांची गैरसोय..

दिनांक ९ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:

तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून नवीन आणि दुबार रेशनकार्ड मिळवण्यासाठी अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड असणे अत्यावश्यक असते. मात्र, अनेकांचे रेशनकार्ड अद्याप ऑनलाईन झाले नसल्यामुळे, हे नागरिक विविध शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. पुरवठा विभागातून माहिती घेतल्यानंतर असे दिसून आले की, श्रीगोंदा शहर आणि तालुक्यातील सेतू केंद्र, CSC केंद्र, आणि कॉम्पुटर कॅफे चालक हे रेशनकार्ड अर्ज ऑनलाईन करण्याच्या प्रक्रियेत उदासीन आहेत. 

या उदासीनतेमुळे, नागरिकांना वेळोवेळी शासकीय सेवांचा लाभ घेण्यास अपयश येत आहे. दरम्यान, पुरवठा विभागातील निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करून विभाग सुरळीत करण्यात आला होता. मात्र, सेतू आणि CSC केंद्र चालकांनी नागरिकांशी अरेरावीची व अर्वाच्च भाषा वापरल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

अजिनाथ मोतेकर, राजेंद्र राऊत, नवनाथ माने यांनी नायब तहसिलदार अमोल बन यांना निवेदन दिले असून, त्यामध्ये सेतू आणि CSC केंद्रांनी ऑनलाईन रेशनकार्ड अर्ज स्विकारण्यासंदर्भात योग्य त्या सूचना द्याव्यात, तसेच नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्या केंद्र चालकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

स्त्रोत:(निवेदन)

जाहिरात…

Leave a Reply