श्रीगोंदा: घोडेगाव गावातील तारकंपाउंडमुळे विजेचा धक्का बसून मुलगा जखमी..

दिनांक १२ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथील मोहन दादा माळी यांनी पोलीस निरीक्षकांना तक्रार अर्ज दाखल केला आहे की, त्यांच्या गावाशेजारील शेतजमिनीच्या तारकंपाउंडमुळे त्यांच्या मुलाला विजेचा धक्का बसून तो गंभीर जखमी झाला आहे. दिनांक ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजता रोहित मोहन माळी, लघुशंका करण्यासाठी जात असताना, शेतातील कंपाउंडला जोडलेल्या वीजेच्या तारांमुळे त्याला करंट बसल्याने हा अपघात घडला त्यामुळे रोहित गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

तक्रारदार मोहन माळी यांच्या म्हणण्यानुसार, शेतमालक विश्वनाथ सिताराम फटे यांनी त्यांच्या शेतातील तारकंपाउंडला वीज जोडणी करून कोणालाही पूर्वसूचना न देता करंट सोडला होता. यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, आणि कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकते. 

सदर प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोहन माळी यांनी केली आहे.

यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहळ, एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे  महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दत्तात्रय माळी, जिल्हाध्यक्ष संतोषराव पवार, दिनकर पवार, आबा पवार, घोडेगाव ग्रामपंचायत सदस्य सुरेश माळी, दादा माळी, मोहन माळी, हवसराव गोरे ,भानदास माळी, आसाराम काळे, सोमनाथ गोरे व इतर एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्त्रोत:(प्रसिध्दी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading