दिनांक ११ मे(मढेवडगाव,श्रीगोंदा):
मढेवडगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या इयत्ता चौथीतील ओंकार नवनाथ वाबळे याने आई-वडिलांनी दिलेल्या खाऊच्या पैशातून बचत केलेले, १५५५ रुपये आपल्या वाढदिवशी करोना महामारीच्या संकटात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
वडिलांची हलाखीची परिस्थिती,शिवणकाम करून उदरनिर्वाह करणारे हे सामान्य कुटुंब. आपल्या मुलाला शाळेत जाताना खाऊला थोडेफार दिलेले पैसे . पण ओंकार लहान वयातही अर्थसंकल्प जाणणारा मुलगा निघाला. त्याने खाऊच्या पैशाची बचत करण्यासाठी घरातच पिग्मी बँक सुरू केली. सध्या लॉक डाऊनमूळे परीक्षा नाही अभ्यास ऑनलाइन. दरवर्षी परिस्थितीला जपून वाढदिवस साजरा करणारे,आई वडील यांनी घरातच राहून वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. घरगुती वाढदिवस साजरा केला परंतु “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात” या म्हणीप्रमाणे ओंकारने टी.व्ही. वरील बातम्या पाहून देश, राज्य संकटात आहे.हे जाणून खाऊचे पैसे वडिलांशी बोलून मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे ठरविले.
आज दि. ११ रोजी त्याच्या वडिलांना श्रीगोंदयाला तहसील कार्यालयात पाठवून त्याने रुपये १५५५ रुपयांचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीस देऊन समाजाप्रती उत्तरदायित्व सिध्द केले. यावेळी नायब तहसीलदार योगिता ढोले यांनी चेकचा स्वीकार केला.यावेळी, परिक्षाविधीन तहसीलदार चारुशीला पवार, सायली नांदे, स्मितल वाबळे, नवनाथ वाबळे, सुहास काकडे, सागर मोहिते, भानुदास वाबळे सोशल डिस्टन्सिग पाळून उपस्थित होते.
