रद्द झालेल्या परीक्षांची फी विद्यार्थांना परत करावी:आदिल शेख.

दिनांक ११ मे,श्रीगोंदा:

कोरोणा विषाणुचे सावट संपुर्ण जगावर पसरले असल्यामुळे शाळा व महाविद्यालय बंद होते. विद्यार्थांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होउ नये.या उद्देशाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी प्रथम व द्वितीय वर्षाच्या रद्द करत अंतिम वर्षाच्या परिक्षा होतील असे जाहीर केले.

या अभिनव निर्णयांचे स्वागत विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष आदिल शेख यांनी केले असुन, ना.उदय सामंत यांनी हा महत्वपुर्ण निर्णय घेत विद्यार्थांच्या मनावरील एक दडपण बाजुला करण्याचे काम केले आहे.परंतु,या सर्व परिस्थीतीमध्ये परिक्षा रद्द झाल्यांने परिक्षासांठी येणारा आर्धिक खर्च कमी होत असल्याची बाब निरर्शनास आणुन देत, आदिल शेख यांनी परीक्षा फी परत करण्याची मागणी ट्विटरच्या माध्यमातून निवेदन देत केली आहे.

ग्रामीण भागातील विदयार्थांचा शिक्षणासाठीचा सर्घंष प्रचंड मोठा असुन,आजही अनेक विद्यार्थी मोलमजुरी करत स्वत:चे शिक्षण स्वत:च्या पायावर करत आहेत. ग्रामीण भागातील पालक मुलांच्या शिक्षणासाठी वणवण करत आहेत.अशा परिस्थीती मध्ये सरकारने जर परिक्षा रद्द झालेल्या विद्यार्थांची प्ररिक्षा फी परत केली.तर,पीडित कुटुंबांना पर्यांयाने जगण्याची एक नवी उमेद मिळाल्याशिवाय राहणार नाही.अशी माहिती शेख यांनी माध्यमांना प्रसिद्धीसाठी दिली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading